नागपूरच्या गजबजलेल्या मार्केट परिसरात देहविक्रीचा धंदा, लॉजवर पोलिसांचा सापळा, अखेर तरुणीचा सुटका, आरोपीला बेड्या

नागपूर पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे नागपुरातील गजबजलेल्या मार्केटमधील एका लॉजमध्ये हा सर्व गैरप्रकार सुरु होता.

नागपूरच्या गजबजलेल्या मार्केट परिसरात देहविक्रीचा धंदा, लॉजवर पोलिसांचा सापळा, अखेर तरुणीचा सुटका, आरोपीला बेड्या
नागपूरच्या गजबजलेल्या मार्केट परिसरात देहविक्रीचा धंदा, लॉजवर पोलिसांचा सापळा, अखेर तरुणीचा सुटका, आरोपीला बेड्या
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 4:09 PM

नागपूर : नागपूर पोलिसांनी देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे नागपुरातील गजबजलेल्या मार्केटमधील एका लॉजमध्ये हा सर्व गैरप्रकार सुरु होता. पोलिसांना या गैरप्रकाराची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याच माहितीच्या आधारावर तपास केला. तपासादरम्यान संबंधित माहिती खरी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज कारवाई केली. यासाठी पोलिसांनी गनिमी कावा करत आरोपीला रंगेहात पकडलं. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर एका तरुणीची सुटका केली आहे. पोलिसांच्या या कामाचं शहरात कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं?

नागपूरमध्ये सीताबर्डी परिसरात मोठी मार्केट आहे. हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. तसेच संबंधित परिसर हा मार्केट परिसर म्हणूनच ओळखला जातो. मात्र याच मार्केट परिसरात असलेल्या नूतन लॉजमध्ये विकृत कृत्य गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होते. या लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून देहविक्रीचा व्यवयास सुरु होता. अखेर नागपूरच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

पोलिसांनी सापळा रचला

नागपूर पोलिसांनी सुरुवातीला गनिमी कावा पद्धतीने संबंधित परिसरात जावून पाहणी केली. तिथे पोलिसांना काही संशयास्पद घडामोडी घडताना दिसल्या. त्यानंतर काही खात्रीलायक सुत्रांकडून माहिती मिळवली. त्यानंतर संबंधित प्रकार खरा असल्याचं पोलिसांना खात्री पटली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपींना रंगेहाथ पकडण्याचं ठरवलं. त्यानुसार एक पोलीस कर्मचारी संबंधित लॉजमध्ये ग्राहक म्हणून गेला. तिथे त्यांनी बातचित करत व्यवहार निश्चित केला.

पोलिसांचा तपास सुरु

लॉजमध्ये गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने योग्यवेळी संधी साधत बाहेर असलेल्या पोलिसांना सूचना देत आतमध्ये बोलावलं. अशाप्रकारे पोलिसांनी एका आरोपीला रंगेहाथ पकडलं. तर एका तरुणीची यातून सुटका करण्यात आली. संबंधित व्यवसाय नेमका किती दिवसांपासून सुरु होता, त्यामध्ये नेमकं कोण-कोण गुंतलं आहे, याचा शोध पोलिसांकडून सुरु आहेत. पण अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्यांना नागपूर पोलिसांकडून सुटका केली जाणार नाही, हेच या कारवाईतून दिसून येत आहे. पोलिसांचा सध्या या प्रकरणी तपास सुरु आहे.

पिंपरीतील स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

दुसरीकडे गेल्या आठवड्या पिंपरी चिंचवडमधील एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं होतं. पोलिसांना या कारवाईतून वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार तरुणींची सुटका करण्यात आली होती. तर त्यांच्याकडून देह व्यापार करुन घेणाऱ्या दोघा जणांना सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली होती. पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये हा प्रकार घडला.

नालासोपाऱ्यात चाळीत सेक्स रॅकेट

तसेच नालासोपाऱ्यात चाळीतील खोलीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नुकतंच पोलिसांना यश आलं आहे. खोलीत तरुणींना डांबून ठेवून, त्यांना जबरदस्ती वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जात असल्याचा आरोप आहे. नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला.

चार पीडित मुलींची सुटका

नालासोपारा पूर्व पेल्हार गावातील खान कम्पाउंडमध्ये संबंधित महिला हे सेक्स रॅकेट चालवत होती. ती भाभी नावाने परिचित होती. वालीव पोलिसांनी छापा मारुन या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यातील चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली, तर दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

पुण्यात बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा, देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघींची सुटका

अंधेरीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघींची सुटका, तिघांना अटक

नालासोपाऱ्यातील चाळीत वेश्या व्यवसाय, महिलेसह तृतीयपंथीयाला बेड्या, दोन लाखांचे कंडोम सापडले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.