सहा दिवसांपूर्वी 100 किलो गांजा पकडला, त्यानंतर रेल्वेत गांजा लपवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, नागपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
नागपूरच्या बेल तरोडी पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. विशाखापट्टणम येथून गांजाची मोठी खेप घेऊन दिल्लीसाठी निघालेली महागडी कार नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कारमध्ये तब्बल 100 किलो गांजा सापडला आहे.
नागपूर : नागपुरात गांजा तस्करांविरोधात पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरु आहे. पोलिसांनी गेल्या आठवड्यात तब्बल 100 किलो गांज्याची तस्करी करणारी कार पकडली होती. त्यानंतर आज पुन्हा गांजा तस्करांच्या रेल्वेतून मुसक्या आवळल्या आहेत. नागपूर रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने गांजा तस्करीचा भांडाफोड केला आहे. रेल्वेच्या दोन डब्यांमधील कपलिंगमध्ये लपवून ही तस्करी केली जात होती. यात 12 किलो गांजा होता ज्याची किंमत 1 लाख 19 हजार 400 रुपये एवढी आहे.
लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, रेल्वे मार्गाने गांजाची खेप येत आहे. यावरुन त्यांनी प्रत्येक ट्रेनमध्ये चेकिंग सुरु केली. विशाखापट्टणम-नवी दिल्ली ट्रेन आली होती. त्यात पोलिसांनी सर्च सुरु केला असता दोन डब्याच्या मधला भाग ज्याने डब्बे जोडले जातात त्या कापलींगमध्ये एक बॅग लपवून ठेवण्यात आली होती. ती बॅग चेक केली असता त्यात 12 किलो गांजा सापडला. तस्करांनी यावेळी वेगळी युक्ती केली खरी मात्र त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
सहा दिवसांपूर्वी 100 किलो गांजा पकडला
नागपूरच्या बेल तरोडी पोलिसांनी सहा दिवसांपूर्वीच मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली होती. विशाखापट्टणम येथून गांजाची मोठी खेप घेऊन दिल्लीसाठी निघालेली महागडी कार नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतली होती. कारमध्ये तब्बल 100 किलो गांजा सापडला होता. त्याची किंमत तब्बल 15 लाख रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. जावेद अहमद नईम अहमद असे आरोपीचे नाव आहे. तो दिल्लीचा रहिवासी असल्याचं तपासात स्पष्ट झालं होतं. या आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे गांजा तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
पोलिसांनी नेमकी कशी कारवाई केली?
बेलतरोडी पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या सुचनेनुसार जबलपूर बायपास आऊटर रिंगरोड जवळील वेळाहरी गावालगत सापळा रचला होता. पोलिसांना ज्या गाडीची माहिती मिळाली होती ती गाडी दिसताच पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने ती कार थांबवली. पोलिसांनी कारची झडती घेतली तेव्हा त्यात 99 किलो 330 ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 15 लाख इतकी आहे. कारसह सुमारे 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. बेलतरोडी पोलिसांनी जावेद अहमद नईम अहमद नामक आरोपीला अटक केली. त्याच्यावर एन.डी.पीएस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
गांजा तस्करांचा नवा फंडा
गेल्या दोन वर्षांपासून गांजा तस्करांनी गांजाची तस्करी करण्यासाठी महागड्या कारचा उपयोग सुरु केला आहे. यापूर्वी प्रवासी ट्रेनच्या स्लीपर कोचमधून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जायची. मात्र रेल्वे सुरक्षा पथकाने अनेकवेळा कारवाई करुन मोठा मुद्देमाल जप्त केल्याने तस्करांनी कारचा उपयोग सुरु केला आहे. गांजा तस्करीचा मास्टरमाईंड हा दिल्लीच्या सुलतानपुरीचा गोलू नामक आरोपी असल्याची माहिती पुढे आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
यवतमाळमध्ये 1 क्विंटल गांजा जप्त, 5 वर्षातील सर्वात मोठी कारवाई
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील झोंबाडी (बाळेगाव) येथे 17 ऑगस्ट मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 31 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यत आला. यातील एक आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला. नेर तालुक्यात एवढ्या मोठ्या स्तरावर गांजाच्या तस्करी केली जात असल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. पथकाने दिलेल्या माहीतीनुसार ही जिल्ह्यातील 5 वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे.
कुख्यात गांजा तस्कर महिला येत असल्याची मिळाली माहिती
नेर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. या गांजातस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली होती. याच गांजातस्करीबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहीतीनुसार सुलतानपूर येथील कुख्यात गांजातस्कर महिला गांजा देण्यासाठी झोंबाळी येथे येत असल्याचे पोलिसांना समजले.
एकूण 12 पोत्यांत गांजा भरला
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरक्षक प्रदीप परदेशी व सहाय्यक पोलीस निरक्षक विवेक देशमुख यांनी कारवाई केली. त्यानंतर एलसीबी पथकाने काल रात्री 10 वाजता एक ईनोव्हा घरासमोर पकडली. यावेळी गांजातस्कर महिलेही बेड्या ठोकण्यात आल्या. पथकाने इनोव्हा कार व घराची झडती घेतली असता तब्बल 1 क्विंटल 90 किलो गांजा पकडला केला. हा गांजा एकूण 12 पोत्यांत भरण्यात आला होता. पकडण्यात आलेल्या गांजाची एकूण किंमत 22 लाख 50 हजार आहे. तर जप्त करण्यात आलेल्या ईनोव्हाची किंमत 9 लाख रूपये आहे.
हेही वाचा :