नागपूर हिंसाचार प्रकरणात सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणाऱ्या दोघांना अटक, कोण आहेत हमीद इंजिनिअर अन् मोहम्मद सहजाद खान?
Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात हमीद इंजिनिअर याला अटक करण्यात आली आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे.

Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांकडून आता धडक कारवाई सुरु झाली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या १०५ वर केली आहे. त्यात दहा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांकडून गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. शुक्रवारी संध्याकाळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान या प्रकरणात सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. हमीद इंजिनिअर अन् मोहम्मद सहजाद खान अशी त्यांची नावे आहेत.
औरंगजेब समर्थक हमीद इंजिनिअर अटकेत
नागपूर हिंसाचार प्रकरणात हमीद इंजिनिअर याला अटक करण्यात आली आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे. नागपूरातील दंगल प्रकरणात कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. औरंगजेब समर्थक म्हणून त्याची ओळख आहे. सोशल मिडिया मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकल्याचा त्याचावर आरोप आहेत. ज्या भागात हिंसाचार घडला त्याच परिसरात हमीद इंजिनिअर राहतो.
मोहम्मद सहजाद खान याला अटक
सोशल मीडियावर भडकवणारे व्हिडिओ टाकणारा मोहम्मद सहजाद खान यालाही अटक करण्यात आली आहे. तो युट्यूबर आहे. तो डिजिटल पोर्टल चालवतो. औरंगजेब कबर विरोधातील आंदोलनाविरोधात त्याने व्हिडिओ व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हे व्हिडिओ लोकांच्या भावना भडकवणारे होते. त्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला होता.




नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी नागपूर हिंसाचार प्रकरणातील पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगितले. नुकसानग्रस्तांना २-३ दिवसांत मदत वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ मदती करण्याचे आदेश दिले आहे. ज्यांचे पंचनामे राहिले त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्राथमिक सर्वेक्षणात 20 दुचाकी,40 चारचाकीचे नुकसान झाले तर 2 क्रेन जाळण्यात आल्या आहेत. उड्डाणपुलाच्या कामासाठी असणाऱ्या क्रेन जाळण्यात आल्याने सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा कंस्ट्रक्शन कंपनीचा दावा आहे. वाहनाचे पूर्ण नुकसान झाल्यास प्रति वाहन 50 हजार रुपये मिळणार आहे. अंशतः नुकसान झाल्यास प्रति वाहन 10 हजार मिळणार आहे. विम्याचा लाभ घेतल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही.