नागपूरच्या रेल्वे स्थानकावर मध्यरात्री 3 वाजता प्रवाशांवर खुनी हल्ला, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी
नागपूर रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांकावर ७ वर रात्री ३ वाजून २० मिनिटांची घडली. काही प्रवासी ट्रेनची वाट बघत होते तर काही प्रवासी आणि भिक्षेकरी हे फलाटावर झोपले होते. त्यावेळी एक मनोरुग्ण इथे आला. त्याने आधी शांतपणे पाहणी केली यानंतर अचानक त्याने हल्ला करण्यास सुरुवात केली.
एका मनोरुग्णानं नागपूर रेल्वे स्थानकावर अनेक प्रवाशांवर केलेल्या हल्ल्यामुळे दोघांचा जागीचं मृत्यू झाला आहे. तर दोन प्रावसी गंभीर जखमी झाले आहेत. एक प्रवासी गंभीर असून त्यांच्यावर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरू आहेत. गणेश कुमार डी- (५४) ( दिंडीगुल तामिळनाडू) असे मृतकाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृतकाची अद्याप ओळख पटली नाही. लोहमार्ग पोलिसांनी मनोरुग्ण जयराम केवट याला अटक केली आहे. आरोपी हा उत्तर प्रदेशचा निवासी असून तो नागपूर रेल्वे स्थानकावर काय करत होता? याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटना नागपूर रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांकावर ७ वर रात्री ३ वाजून २० मिनिटांची घडली. काही प्रवासी ट्रेनची वाट बघत होते तर काही प्रवासी आणि भिक्षेकरी हे फलाटावर झोपले होते. त्यावेळी एक मनोरुग्ण इथे आला. इतर सामान्य प्रवाशांप्रमाणे त्याचा वावर असल्याने तो मनोरुग्ण असेल आणि इतका हिंसक आणि आक्रमक असेल अशी कुणालाच शंका आली नाही. काही वेळ स्टेशनवर वावरल्यानंतर अचानक त्या मनोरुग्णानं लाकडी रायफटरनं प्रवाशांवर हल्ला केला. सुरुवातीला काय झाले हे कुणालाच कळाले नाही. मनोरुग्णानं रायफटरनं १२ लोकांवर हल्ला केला ज्यात दोन प्रवासी ठार झाले. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत.
आरोपी उत्तरप्रदेशचा रहिवासी
आरोपी जयराम रामअवतार केवट हा उत्तरप्रदेश राज्यातील सितापूर जिल्ह्यातील हैदरपूर येथील रहिवासी आहे. आरोपीने स्टेशनवर अनेकांसोबत वाद घातला. त्यानंतर तो अचानक हिंसक झाला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत. आरोपी नागपूर रेल्वे स्थानकावर कसा पोहचला याबाबत सुद्धा पोलीस तपास करत आहे.
आरोपी इतरांवर हल्ला करण्याचा बेतात असताना केली अटक
पोलिसांनी मनोरुग्ण आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांकडून आरोपीची माहिती घेतली. त्यावेळी समजले की, आरोपी पांढरा शर्ट घातला असून त्याला घनदाट दाढी आहे. एवढ्या माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी शोध सुरू केला. आरोपी प्रचंड आक्रमक आणि हिंसक आहे, त्याच्या हातात लाडकी राफटर असल्याने तो अन्य कुणावर हल्ला करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात असताना पोलीस उपनिरीक्षक इंगळे यांनी कर्मचाऱ्यांसह आरोपीचा शोध सुरू केला. संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर आरोपी हा पुन्हा फलाट क्रमांक सातकडे दिसल्याची सूचना मिळताच जीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.