‘प्यार में चांद तारे तोड़ लाने वाले लड़के’… त्यांनी गर्लफ्रेंडसाठी असे काही केले की पोलिसांना बसला शॉक

Boy friend Girl friend crime Story: प्रेयसीला आयफोन विकत घेऊन देण्यासाठी त्यांची घरफोडी केल्याचे सांगितले. घरफोडी करणारे दोघेही सख्खे भाऊ आहे. त्यांच्यावर यापूर्वीचे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेच. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

'प्यार में चांद तारे तोड़ लाने वाले लड़के'... त्यांनी गर्लफ्रेंडसाठी असे काही केले की पोलिसांना बसला शॉक
boyfriend girlfriend File Photo
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 2:28 PM

Boy friend Girl friend crime Story: ‘प्रेमवीर अनेक वेळा प्यार में चांद तारे…’ आणण्याचे आश्वासन प्रेयसीला देतात. कवींना सुद्धा आपली प्रेयसी ‘चाँद का तुकडा’ वाटते. प्रियकर आणि प्रेयसी यांच्या प्रेमकथेवर अनेक चित्रपटसुद्धा निघाले आहेत. परंतु नागपूरमधील प्रेमीवर जरा अनोखेच निघाले. त्यांनी प्रेयसीसाठी जे काही केले, त्याचा धक्का पोलिसांना बसला. हा प्रकार करणारे दोघे सख्ये भाऊ अल्पवयीन होते. त्यामुळे त्यांच्या पालकांना बोलवून समज देऊन सोडण्यात आले. या दोघ भावांनी प्रेयसीला आयफोन देता यावा, यासाठी घरफोडी केली होती.

काय झाला प्रकार

गर्लफ्रेंडला आयफोन घेऊन देण्यासाठी घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन दोन सख्ख्या भावांना नागपूर जिल्ह्यातील कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूरच्या कळमना पोलिस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पहाटेच्या पाच वाजताच्या सुमारास दोन अल्पवयीम मुले दिसली. ही दोन्ही मुले कामना नगर रेल्वे स्टेशन फाटक जवळ फिरत होती. पोलिसांना संशय आला. त्यांनी त्या दोघांना विचारणा सुरु केली. ते दोन अल्पवयीन मुले सख्खे भाऊ निघाले. पोलिसांना पाहून ते पळण्याच्या तयारीत होते.

पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस सुरु केली. त्यावेळी त्यांनी घरफोडी केल्याचे कबूल केले. त्यांनी घरफोडी का केली त्याचे कारण पोलिसांना सांगितले. ते ऐकून पोलिसांना शॉक बसला. या दोघांनी ही घरपोडी आपल्या गर्लफ्रेंडसाठी केली.

हे सुद्धा वाचा

तिला आयफोन विकत घेऊन देण्यासाठी त्यांची घरफोडी केल्याचे सांगितले. घरफोडी करणारे दोघेही सख्खे भाऊ आहे. त्यांच्यावर यापूर्वीचे घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेच. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ते मुले अल्वपयीन असल्यामुळे त्यांच्या पालकांना बोलून त्यांना सूचना पत्र देऊन सोडण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चर्चा परिसरात चांगलीच झाली.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.