AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्धा हादरलं! शाळेत जाणाऱ्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून धावत्या गाडीत बलात्कार

Wardha News : शाळेत जात असताना अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून आधी तिचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिला कारमध्ये बसवून एका आरोपीने धावत्या गाडीत या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.

वर्धा हादरलं! शाळेत जाणाऱ्या मुलीवर चाकूचा धाक दाखवून धावत्या गाडीत बलात्कार
वर्ध्यात बलात्कारImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 24, 2022 | 10:54 AM
Share

वर्धा : वर्धा (Wardha Crime News) जिल्ह्यातून हादरवून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शालेय विद्यार्थीनीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार (Wardha Rape) करण्यात आला असून ही संतापजनक घटना धावत्या गाडीत घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल घेतला आहे. आरोपींविरोधात कडक कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र या घटनेमुळे विद्यार्थीनींच्या पालकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. आपल्या मुलींच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे शाळेच्या गेटवरुन या विद्यार्थीनीला नेण्यात आलं होतं. त्यानंतर गाडीमध्ये बसवून या विद्यार्थीनीवर नराधमांनी अतिप्रसंग केला. ही धक्कादायक घटना पीडितेने जेव्हा ही आपल्या आईला सांगितली, त्यानंतर याप्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी (Wardh Police) पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी खुलासा करण्यात आलाय.

धावत्या गाडीतच तिचे लचके तोडले

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे ही संतापजनक घटना घडलीय. पुलगाव येथे शाळेत जात असताना  13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून आधी तिचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिला कारमध्ये बसवून एका आरोपीने धावत्या गाडीत या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. पुलगाव पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय.

गुन्हा दाखल, वर्ध्यात संताप

पीडिता ही शाळेत जात होती. दरम्यान, पीडिता ही शाळेसमोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता आरोपी सुमेध मेश्राम याने आवाज दिला आणि चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती चारचाकी वाहनात बसवले. अनोळखी युवकाने चारचाकी समोर नेली. दरम्यान सुमेध मेश्राम याने पीडितेवर धावत्या कारमध्ये बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेनं आपबिती तिच्या घरच्यांना सांगितल्यावर अखेर पीडितेच्या आईन पोलीस स्थानक गाठलं. पीडितेच्या आईने पुलगाव पोलीस ठाण्या याप्रकरणी तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला. पुलगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांनी याबाबतची माहिती दिलीय. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.