इंटरनेटवर नोकरीची जाहिरात, तरुणी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या!, नागपूर पोलिसांकडून आरोपी गजाआड

3 तरुणींना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ढकलणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातील पोलिसांनी हरियाणा आणि हैदराबाद इथल्या दोन दलालांना या प्रकरणात अटक केली आहे.

इंटरनेटवर नोकरीची जाहिरात, तरुणी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या!, नागपूर पोलिसांकडून आरोपी गजाआड
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 11:00 AM

नागपूर : नोकरी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन 3 तरुणींना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ढकलणाऱ्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातील पोलिसांनी हरियाणा आणि हैदराबाद इथल्या दोन दलालांना या प्रकरणात अटक केली आहे आणि त्यांच्या ताब्यातून 3 तरुणींची मुक्तता केली आहे. या प्रकरणात अजून कुणी गुंतलं आहे का? याचा शोधही पोलिस घेत आहेत.(Nagpur police exposes sex racket)

अटक करण्यात आलेले आरोपी बऱ्याच काळापासून देह व्यापारात गुंतलेले होते. ते नागपुरात सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकानं त्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान आरोपींनी काही दिवसांपूर्वी नागपूर-अमरावती मार्गावरील भरतनगर परिसरातील स्वामी संकेत अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी एक डमी ग्राहक पाठवून माहितीची सत्यता पडताळली. त्यानंतर पोलिसांनी या प्लॅटवर छापा टाळून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कृष्णकुणार वर्मा आणि मोहम्मद मोबिन मोहम्मद ख्वाजा नावाच्या दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील 3 तरुणींची मुक्तता केली आहे.

1 लाख रुपये पगाराचं आमिष

काही दिवसांपूर्वी आरोपींनी इंटरनेटवरील एका प्रचलित साईटवर नोकरी उपलब्ध असल्याची जाहीरात दिली होती. ती जाहीरात पाहून फरिदाबादमधील 3 तरुणींनी आरोपींना संपर्क केला. दर महिण्याला 1 लाख रुपये पगार मिळेल, असं आश्वासन मिळाल्यानंतर तिनही तरुणी नागपुरात आल्या. त्यानंतर आरोपींनी नागपूर – अमरावती रोडवरील भरतनगर परिसरातील स्वामी संकेत अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर त्यांची राहण्याची व्यवस्था केली. आरोपींनी गेल्या काही दिवसांत या तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून हा सगळा व्यवसाय सुरु होता.

पिंपरी-चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात 2 फेब्रुवारी रोजी मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. या भागातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 नायजेरियन तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. 4 महिला या तरुणींचा ग्राहकांना पुरवठा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कारवाईबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी माहिती दिली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठल कुबडे ,सहय्य्क पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे आणि सहकारी यांनी हि कारवाई केली होती.

संबंधित बातम्या :

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, बॉलिवूड अभिनेत्रीसह तिघांना अटक

सांगलीत हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, पोलीस निरीक्षकालाच बेड्या, दोघींची सुटका

Nagpur police exposes sex racket

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.