नांदेडमध्ये ‘लव्ह-जिहाद’ की प्रेम प्रकरण? बटाईदाराच्या दहावी नापास पोराबरोबर मुलगी पळाली, 72 लाखाचे दागिने घेऊन गेल्याची पोलिसात तक्रार

एका कापड व्यवसायिकाच्या मुलीचे बटाईदाराच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. याच प्रेमसंबंधातून त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. पण मुलीच्या कुटुंबियांनी मुलावर गंभीर आरोप केले आहेत (Nanded textile businessman allegations of robbery on his daughter and his lover after their love marriage).

नांदेडमध्ये 'लव्ह-जिहाद' की प्रेम प्रकरण? बटाईदाराच्या दहावी नापास पोराबरोबर मुलगी पळाली, 72 लाखाचे दागिने घेऊन गेल्याची पोलिसात तक्रार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 6:01 PM

नांदेड : नांदेडच्या हणेगाव येथील एका कापड व्यवसायिकाच्या मुलीचे बटाईदाराच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. याच प्रेमसंबंधातून त्यांनी पळून जाऊन लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. पण मुलीने पळून जाताना घरातील 72 लाखांचे दागिने, 25 लाखांची रोख रक्कम नेली, असा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच मुलाने मुलीचे धर्मांतरही केल्याता आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी मुलीचे वडील संजिवकुमार काशिनाथअप्पा अचारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे (Nanded textile businessman allegations of robbery on his daughter and his lover after their love marriage).

नेमकं प्रकरण काय?

देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील एका कापड व्यावसायिकाची मुलगी प्रियकरासोबत घर सोडून निघून गेली. मुलीचं वय 19 वर्ष आहे. ती इयत्ता बारावी उत्तीर्ण आहे. तर मुलगा दहावी नापास आहे. मुलीचे वडील हे मोठे कापड व्यवसायिक आहेत. तर मुलाचे वडील हे मुलीच्या वडिलांची शेती कसत होते. मुलीने प्रियकरासोबत पळून जाताना घरातील 72 लाखांचे दागिने घेवून गेल्याची तिच्या नातलगांची तक्रार आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी मुलीचे कुटुंबिय न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मरखेल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या वडिलांचे नेमके आरोप काय?

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार बटाईदार असणाऱ्या मोइनोद्दीन अत्तार यांच्या मुलाने मुलीशी जवळीक आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केल्याचा आरोप आहे. यात मुलीच्या प्रियकराने परंपरागत 74 तोळ्याचे दागदागिने, सोने, नगद 25 लाख रुपयासह पोबारा केलाय, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच मुलाने मुलीचे धर्मांतर करुन इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे (Nanded textile businessman allegations of robbery on his daughter and his lover after their love marriage).

न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद

दरम्यान, मुलीला पळवून नेल्याची तक्रार देण्यास गेलेल्या वडिलांचा मरखेल पोलिसांनी आधी व्हिडिओ जवाब घेतला. पण त्यानंतर आठ दिवस तक्रार घेतली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी न्यायालयाचं दार ठोठावलं. त्यानंतर न्यायालयात दाद मागून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला, असा दावा करण्यात आला आहे.

मुलाने मुलीचे धर्मांतर केले, व्यावसायिकाच्या कुटुंबियांचा दावा

रकमेसह पलायन केलेल्या प्रियकराने हैदराबाद येथे मुलीचे धर्मांतर केले, असा आरोपही मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. पण त्याचवेळी नांदेड पोलिसांनी छापा मारून संबंधितांना ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे हणेगाव येथे तणाव पूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

हेही वाचा : 

आईची हत्या करुन अवयव भाजून खाल्ले, नराधम मुलाला फाशीची शिक्षा, कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा फाशी

कुख्यात गुंड सहा महिन्यांपूर्वी जेलमधून सुटला, नागपूरच्या पांढरबोडी भागात घुसताच दुश्मनांनी घेरलं, विटांनी ठेचून हत्या

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.