Nashik | 127 किमी वेगाने दुचाकी झाडावर आदळली; 2 मित्र 30 फूट खोल खड्ड्यात पडून गतप्राण

पंकज पवार हा नाशिकमधील संदीप फाउंडेशनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता. त्याला आई-वडील नसल्याने त्याचा सांभाळ सुरगाणा येथील पोलीस पाटील चंद्रकात भोये करत होते. त्याने नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमदेवारी दाखल केली होती.

Nashik | 127 किमी वेगाने दुचाकी झाडावर आदळली; 2 मित्र 30 फूट खोल खड्ड्यात पडून गतप्राण
Bhola Bagul, Pankaj Pawar
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 10:16 AM

नाशिकः दारू असो की वेग. कुठलिही नशा अती केली की, ती तुम्हाला मरणाच्या दारात घेऊन जाते. नेमकी अशीच घटना नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या घागबारी येथे घडली. यात तब्बल 127 किलोमीटरच्या वेगाने दुचाकीवरून जाणाऱ्या मित्रांची गाडी झाडावर धडकून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर एकाची मृत्यूशी झुंज सुरूय. वणी-सापुतारा मार्गावर झालेल्या या अपघाताने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

असा झाला अपघात

भोला हिरामण बागुल (वय 22, रा. साबरदरा), पंकज जयराम पवार (वय 21, बोरपाडा कोटंबी) आणि राहुल गोपाळ चौधरी (वय 23, उंबरपाडा, सुरगाणा) हे तिघेही दुचाकीवरून वणी येथून सुरगाणा येथे परतत होते. त्यांच्या गाडीचा वेग भयंकर होता. घागबारी फाटा परिसरात त्यांची गाडी स्लीप झाली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी थेट झाडावर जावून आदळली. त्यानंतर दोघे 30 फूट खोल खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात भोला बागुल आणि पंकज पवार यांचा मृत्यू झाला. राहुल चौधरीची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते. सुरगाणा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

एक नगरपंचायतीचा उमेदवार

पंकज पवार हा नाशिकमधील संदीप फाउंडेशनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता. त्याला आई-वडील नसल्याने त्याचा सांभाळ सुरगाणा येथील पोलीस पाटील चंद्रकात भोये करत होते. त्याने नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमदेवारी दाखल केली होती. या निवडणुकीचा येत्या बुधवारी निकाल आहे. तर भोला बागुल हा एका ग्रामसेवकाचा एकलुता एक मुलगा होता. तर जखमी राहुल एन. डी. गावित यांचा भाचा आहे. यातील कोणाचेही लग्न झालेले नाही.

विनाहेल्मेट सुस्साट

नाशिकमध्ये दुचाकीस्वारांचे अपघात सत्र थांबताना दिसत नाही. ऑगस्ट महिन्यात 9 दुचाकीस्वारांचा वेगवेगळ्या अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या नऊही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते. हे अपघातसत्र थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी हेल्मटसक्ती सुरू केली आहे. खरे तर प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो. त्याने दुचाकीवरून जाताना हेल्मेट वापरावे, वेग कमी ठेवावा, असे आवाहन पोलीस करत आहेत.

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.