AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कट्टरवाद्यांना बच्चू भाऊंचा घरचा आहेर, नाशिकच्या ‘त्या’ हिंदू-मुस्लिम लग्नाला पाठिंबा, धर्माच्या ठेकेदारांना तंबी

हिंदू आणि मुस्लिम समाजात होणाऱ्या एका लग्नसोहळ्याची पत्रिका सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरते आहे.

कट्टरवाद्यांना बच्चू भाऊंचा घरचा आहेर, नाशिकच्या 'त्या' हिंदू-मुस्लिम लग्नाला पाठिंबा, धर्माच्या ठेकेदारांना तंबी
बच्चू कडू, राज्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 3:09 PM
Share

नाशिक : हिंदू आणि मुस्लिम समाजात होणाऱ्या एका लग्नसोहळ्याची पत्रिका सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरते आहे. 18 जुलै रोजी नाशिकमध्ये पार पडणारा हा सोहळा खरं तर सगळ्यांसाठीच एक आदर्श ठरणार होता. मात्र या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आल्याने तसेच काही धार्मिक कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे हे लग्नच रद्द झाले आहे. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या कुटुंबाला भेट देत पाठिंबाच नाही तर लग्नाला उपस्थित राहण्याचं आश्वासन देखील दिलंय.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील एका हिंदू कुटुंबातील तरुणीचे मुस्लिम समाजाच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी 21 मे रोजी नोंदणी पद्धतीने लग्नही केले. विशेष म्हणजे संबंधित तरुणी ही दिव्यांग असतांनाही मुलाने कुठल्याही अटीशिवाय स्व-इच्छेने हे लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे वधू कुटुंबीय देखील खूश होते.

लग्न पत्रिका छापणं परिवारासाठी अडचणीचं ठरलं

नोंदणी पद्धतीने विवाह तर झाला. मात्र मुलीचे वडील एक नामांकित सराफ व्यावसायिक असल्याने हा सोहळा नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही धर्माच्या कुटुंबातील सदस्यांची लग्नाबाबत झालेली बैठक यशस्वी होताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन हा सोहळा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत 18 जुलै 2021 रोजी शहरातील तिडके कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्याचे ठरले. मात्र लग्न पत्रिका छापणे हे या परिवारासाठी अडचणीचे ठरले.

कट्टरवाद्यांकडून लव्ह जिहादचा ठपका

लग्नपत्रिका काही कट्टरवादी धार्मिक संघटनांच्या डोळ्यात खुपली. त्यांनी हे लग्न म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला. लव्ह जिहादच्या नावाने ही पत्रिका व्हॉट्सअ‍ॅप तसेच फेसबुकच्या माध्यमातून तुफान व्हायरल झाली. व्हॉट्सअ‍ॅपवर संबंधित पत्रिका आणि लव्ह जिहादचा मेसेज येताच अनेकांनी ते तसेच्या तसे पुढे फॉरवर्ड केले. मात्र यामुळे वधूकडील मंडळींना प्रचंड मनस्ताप झाला.

बच्चू कडू यांनी कुटुंबाची भेट घेतली

दरम्यान, मंत्री बच्चू कडू नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांना पाठिंबा तर दिलाच, त्यासोबत धर्माच्या आड या कुटुंबाका त्रास देणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना चांगली तंबी दिली. या सगळ्या प्रकरणामुळे मोठा मनस्ताप झाला. मात्र परिवाराने आम्हाला समजून घेतल्याने आनंद वाटला, अशी प्रतिक्रिया मुला-मुलीने दिली

धमकी देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अंनिसची मागणी

या प्रकरणात परिवारांना ज्या संघटनांनी धमकावलं, तसेच लग्नावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली त्या लोकांवर जातपंचायत कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.

प्रेमाला जात, धर्म नसतो असं म्हणतात. अनेकदा आंतरधर्मीय विवाहावर चित्रपट देखील आपण बघितले असतील. मात्र ज्यावेळी खरोखर आपल्या घरात आंतरधर्मीय विवाह ठरतो तेव्हा काय सहन करावा लागतं हे नाशिकच्या या दोन परिवारांनी चांगलंच अनुभवलं !

हेही वाचा : 

मुलगी तयार, तिच्या घरचे तयार, बाहेरचे म्हणतायत ‘लव्ह जिहाद’, पुण्यात जोडप्याला लग्नाआधीच धमक्या!

राज्यमंत्री बच्चू कडूंची नाशिक कोर्टात हजेरी, महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर हात उगारल्याचा आरोप

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.