AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाभळीवर खिळे ठोकले, लिंबू,काळ्या बाहुल्या लटकवल्या; नाशिकमध्ये जादूटोण्याच्या प्रकारामुळे घबराट

स्मशानालगत असलेल्या बाभळीच्या झाडाला खिळे ठोकत त्यावर लिंबू आणि काळ्या बाहुल्या बांधून पूजाअर्चा केल्याचं समोर आलंय.

बाभळीवर खिळे ठोकले, लिंबू,काळ्या बाहुल्या लटकवल्या; नाशिकमध्ये जादूटोण्याच्या प्रकारामुळे घबराट
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 4:00 PM
Share

नाशिक : नाशिकमध्ये बाबा, बुवांच्या खोट्या अफवाना अनेक जण बळी पडताना दिसतायत. पंचवटीमधील अमरधाम परिसरात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे स्मशानालगत असलेल्या बाभळीच्या झाडाला खिळे ठोकत त्यावर लिंबू आणि काळ्या बाहुल्या बांधून पूजाअर्चा केल्याचं समोर आलंय. एका बाभळीच्या झाडावर केलेल्या या जादूटोण्याच्या प्रकाराचा अंधश्रद्धा निर्मूल समितीने पर्दाफाश केला आहे. (black magic incident in Panchavati people got scared)

काटेरी बाभळीला अज्ञातांनी लोखंडी खिळे ठोकले

मागील काही दिवसांपासू नाशिकमध्ये अंधश्रद्धेतून काही अघोरी प्रथा आणि पूजाअर्चा केल्याच्या घटना समोर येत आहेत. सध्या अशाच प्रकारच्या आणखी एक प्रकार समोर आला आहे. ही घटना पंचवटीमधील अमरधाम परिसरात घडली आहे. येथे स्मशानालगत असलेल्या एका काटेरी बाभळीला काही अज्ञातांनी लोखंडी खिळे ठोकले आहेत. तसेच या खिळ्यांच्या मदतीने बाभळीवर लिंबू आणि काळ्या बाहुल्या लटकवण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे येथे काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच हा प्रकार कोणी केला असावा याबद्दल तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, ही घटना समोर आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार फक्त लोकांना लुबाडण्यासाठी करण्यात आल्याचं सांगत याचा भंडाफोड केला आहे.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये घडला होता असाच प्रकार 

अशा घटनांमध्ये भोंदूबाबांनी सामान्य लोकांना एखाद्या गोष्टीची भुरळ घातलेली असते. तुम्हाला भरपूर पैसा मिळेल. तुमचे चांगले होईल अशा प्रकारे आमिष दाखवले जाते. त्यानंतर हे मांत्रिक लोकांकडून पैशांची मागणी करतात. लोकसुद्धा अशा प्रकारांना बळी पडतात. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये असाच एक प्रकार घडला होता. नाशिकच्या सिडको परिसरात पैशांचा पाऊस पाडतो असं सांगत एका भोंदूबाबाने लोकांना लुटलं होतं.

असे प्रकार आढळल्यास पोलिसांना कळवा 

दरम्यान, पंचवटी परिसरातील ही घटना समोर आल्यानंतर घटनास्थळावरून जादूटोण्याचं सर्व साहित्य जप्त करण्यात आलंय. तसेच जादूटोना करणं कायद्याने गुन्हा आहे. मात्र काही जण भोंदुगिरी करत आपली पोळी भाजत असल्याचं समोर येत आहे. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे. तसेच तुमच्या भागातही असा जादूटोण्याचा प्रकार समोर आला तर घाबरून न जाता, पोलिसांना माहिती द्यावी. तसेच भोंदुगिरी करणाऱ्या लोकांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलं आहे.

इतर बातम्या :

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरण, अभिनेत्री हीना पांचाळला अखेर जामीन मंजूर

आईच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुपसला, ठाण्यात हत्येचा थरार, मुलाला अटक

Raj Kundra : राज कुंद्रांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, डर्टी पिक्चरची पाळंमुळं खोदणार!

(black magic incident in Panchavati people got scared)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.