नाशिकमध्ये मंदिरांसह घरांमध्ये चोरी, पकडण्यासाठी तब्बल 48 रिक्षाचालकांची पोलिसांकडून चौकशी, शेवटी बंटी-बबलीला बेड्या
मंदिरं आणि मोठ्या घरांमध्ये चोरी करणाऱ्या बंटी-बबली यांना नाशिक येथील रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेले दोघेही पती-पत्नी असून ते सोबत चोऱ्या करायचे.
नाशिक : मंदिरं आणि मोठ्या घरांमध्ये चोरी करणाऱ्या बंटी-बबली यांना नाशिक येथील रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेले दोघेही पती-पत्नी असून ते सोबत चोऱ्या करायचे. या भामट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मोठी शोधमोहीम राबवावी लागली आहे. मनोज जोशी आणि लक्ष्मी अशी चोटट्यांची नावे आहेत. (burglar husband and wife arrested in nashik police seized 2 lakh rupees)
रिक्षामध्ये फिरून करायचे घरफोडी
मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून नाशिक शहर तसेच त्र्यंबकेश्वर येथे एक दाम्पत्य घरफोड्या करत होते. त्यांच्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मागील अनेक दिवसापांसून नाशिक पोलीस या भामट्यांच्या मागावर होते. हे दोन्ही चोर रिक्षामध्ये फिरत असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना समजली.
आरोपींना पकडण्यासाठी तब्बल 48 रिक्षाचालकांची चौकशी
चोटरे रिक्षामधून त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर नाशिक पोलिसांनी तत्काळ सापळा रचत त्रंबकेश्वर गाठले व परिसरात सगळीकडे तपासणी केली. पोलिसांनी त्र्यंबकेश्वरला जाऊन तब्बल 48 रिक्षाचालकांची चौकशी केली. त्यानंतर संशयित रिक्षाचालकाचे नाव मनोज जोशी असल्याचे पोलिसांना समजले. चोरट्याचे नाव समजल्यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांनी या चोरट्याचा तब्बल तीन दिवस शोध घेतला. शेवटी जोशी टेलिफोन एक्सचेंज त्रंबकेश्वर येथे असल्याची माहिती पोलिसांना भेटली. मात्र, तेथूनही चोरट्यांनी पळ काढला.
आरोपींकडून दोन लाखांचा ऐवज लंपास
शेवटी मनोज जोशी आणि त्याची पत्नी लक्ष्मी नाशिक येथे गेले. यावेळी पोलिसांना त्यांचे फोटो प्राप्त झाले. चोरट्यांचे फोटो भेटल्यानंतर आरोपींचा सोध घेण्यासाठी पोलिसांना अधिक कष्ट घ्यावे लागले नाही. पोलिसांनी नाशिक गाठून दोघांनाही रिक्षासह ताब्यात घेतले. पोलिसांना तपासातून मिळालेल्या माहितीनुसार या चोर असलेल्या पती-पत्नींनी नाशिक रोड परिसरातील काही घरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये घरफोडी केली आहे. दोघेही पती-पत्नी रिक्षामध्ये येऊन घरफोडी करत असत. या दोघांकडून दोन लाख 34 हजार 300 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, चांदीचा मुकुट, आणि रिक्षा यांचा समावेश आहे.
इतर बातम्या :
कल्याणमधील तोडफोड प्रकरणी चौघे जण ताब्यात, आरोपींना पकडण्यासाठी तीन पोलीस पथके
जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका, अभिनेत्रीची याचिका फेटाळली
आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारासारखी – शरद पवार https://t.co/P4kQMWO5h4 @PawarSpeaks @RahulGandhi @NANA_PATOLE @prithvrj @priyankagandhi @INCMaharashtra @NCPspeaks #SharadPawar #Congress #RahulGandhi #soniagandhi #NCP #ThirdFront #NarendraModi
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 9, 2021
(burglar husband and wife arrested in nashik police seized 2 lakh rupees)