मनमाडमध्ये दारु पिण्याच्या जागेवर बसण्यावरुन वाद; तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

सुनीलने जागेवरून उठण्यास नकार दिल्याने याचा राग येऊन दुर्गा प्रसादने खिशातून चाकू काढून सुनीलवर वार केला. या हल्ल्यात तो रक्तबंबाळ होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. सुनीलचा निर्घृणपणे खून केल्यानंतर दुर्गा प्रसाद पसार झाला.

मनमाडमध्ये दारु पिण्याच्या जागेवर बसण्यावरुन वाद; तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या
मनमाडमध्ये दारु पिण्याच्या जागेवर बसण्यावरुन वाद; तरुणाची चाकून भोसकून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 5:02 PM

मनमाड/ रईस शेख : दारू पिण्याच्या जागेवर बसण्याच्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील सावित्रीबाई डेली सब्जी मार्केटच्या इमारतीत घडली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला रेल्वे स्थानकावर अटक करून त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. हत्या केल्यानंतर पळून जाणाच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासात गजाआड केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. किरकोळ कारणावरून खून झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दुर्गा प्रसाद उर्फ जग्गू दादा असे आरोपीचे तर सुनील शंकर महाजन असे मृत तरुणाचे नाव आहे. (Dispute over drinking space in Manmad, youth stabbed to death)

चाकूने वार करुन तरुणाची हत्या

याबाबत अधिक वृत्त असे कि सुनील शंकर महाजन हा तरुण शहरातील मातोश्री सावित्रीबाई फुले डेली सब्जी मार्केटच्या इमारतीत दारू पीत असतो. तेथे दुर्गा प्रसाद उर्फ जग्गू दादा तेथे आला आणि मी रोज या जागेवर बसतो तू का बसला ही जागा माझी आहे येथून उठ असे त्याने सुनीलला सांगितल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. सुनीलने जागेवरून उठण्यास नकार दिल्याने याचा राग येऊन दुर्गा प्रसादने खिशातून चाकू काढून सुनीलवर वार केला. या हल्ल्यात तो रक्तबंबाळ होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. सुनीलचा निर्घृणपणे खून केल्यानंतर दुर्गा प्रसाद पसार झाला.

पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी केले अटक

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे, सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर सुनीलच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. हत्या कोणी केली याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर अधीक्षक खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक समीरसिंग साळवे, सहायक निरीक्षक प्रल्हाद गीतेंसोबत पैठणकर, गांगुर्डे, चव्हाण, पवार, खैरनार, वणवे या पथकाने सापळा रचून रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी दुर्गा प्रसादला रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला गजाआड केल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले मार्केट बनले अवैध धंदे आणि गुन्हेगारांचा अड्डा

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भगतसिंग मैदानाजवळ पालिका प्रशासनाने तब्बल अडीच कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले भाजी मार्केटची तीन मजली इमारत बांधली. मात्र सुमारे 10 वर्षाचा कालावधी उलटूनही या इमारतीचे काम अर्धवट आहे. इमारत पूर्ण झाली नसल्यामुळे भाजीपालासह इतर वस्तू विक्री करणारे व्यावसायिकांना रस्त्यावर बसावे लागते. सध्या ही इमारत अवैध धंदे आणि गुन्हेगारांचा अड्डा बनली आहे. सर्वच प्रकारे अवैध धंदे या इमारतीत चालतात. शिवाय गुन्हेगार देखील या इमारतीत लपून बसतात अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली. याला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. (Dispute over drinking space in Manmad, youth stabbed to death)

इतर बातम्या

Pune Gold Rate | पुण्यात सोन्याला झळाळी, एका दिवसांत 190 रुपयांनी वाढलं सोनं, जाणून घ्या आजचे दर

Video | टोल वसुलीवरुन मनसे पुन्हा आक्रमक, भिवंडीमध्ये लाठ्या-काठ्यांसह टोलनाक्याची तोडफोड

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.