मध्यरात्री गोळीबाराचा थरार, माजी महापौरांवर तीन गोळ्या चालवल्या

Malgegaon Crime News: अब्दुल मलिक रात्री एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. एएमआयएच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर मध्यरात्री मोठा जमाव जमा झाला. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्री गोळीबाराचा थरार, माजी महापौरांवर तीन गोळ्या चालवल्या
अब्दुल मलिक युनूस इसा गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत.
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 7:43 AM

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबाबत चिंता निर्माण करणाऱ्या घटना अधूनमधून समोर येत असतात. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये रविवारी मध्यरात्री गोळीबाराचा थरार रंगला. मालेगाव शहराच्या माजी महापौरांवर गोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात माजी महापौर आणि एएमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.

तीन गोळ्या झाडून हल्लेखोर फरार

एएमआयएमचेचे मालेगाव महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर रविवारी मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. या हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

असा झाला हल्ला

मलिक यांच्यावर हल्ल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घटना घडली.  अब्दुल मलिक रात्री एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. एएमआयएच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही बातमी गेल्यानंतर मध्यरात्री मोठा जमाव जमा झाला. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून नियंत्रणात आहे. मालेगाव शहरात मोठ्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आरोपींना सकाळपर्यंत अटक करण्याची मागणी एएमआयएमकडून करण्यात आली. मालेगावात गुंडाराज सुरू असल्याची टीका मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी केली.

हे सुद्धा वाचा

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी पथके रवाना केली आहेत. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मालेगाव शहरात खळबळ माजली आहे.

मालेगावात पेट्रोल पंपावर गोळीबार

मालेगाव तालुक्यातील झोडगे भागात अज्ञातांनी गोळीबार केला. दोन तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ‘मालकाला सांग 20 पेटी पाठव अन्यथा बघून घेऊ’ अशी धमकी देत त्यांनी हावेत गोळ्या चालवल्या. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हल्लेखोर दुचाकीवर आले होते. पंपावर काम करत असलेल्या इसमाचा मोबाईल हिसकावून त्यांनी पोबारा केला.

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.