‘माझ्यात ऑलिम्पिक पदक जिंकण्याची क्षमता, पण महाराष्ट्रीयन असल्याने कॅम्पबाहेर काढले’

Dattu Bhokanal | महाराष्ट्रीयन असल्यामुळे माझ्याबाबत भेदभाव आणि अन्याय झाला. माझ्यात ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता असूनही अचानक मला शिबीरातून काढण्यात आले.

'माझ्यात ऑलिम्पिक पदक जिंकण्याची क्षमता, पण महाराष्ट्रीयन असल्याने कॅम्पबाहेर काढले'
दत्तू भोकनळ
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 2:47 PM

मनमाड: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नौकानयनात (Rowing) महाराष्ट्राचा झेंडा फडकावणारा रोइंगपटू दत्तू भोकनळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दत्तू भोकनळने अचानक सैन्यदलाचा राजीनामा दिला असून फेडरेशनवर अनेक गंभीर आरोप केले आहे. आपण महाराष्ट्रातील असल्यामुळे फेडरेशनकडून आपल्याला डावलले जात असल्याचे दत्तूचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रीयन असल्यामुळे माझ्याबाबत भेदभाव आणि अन्याय झाला. माझ्यात ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता असूनही अचानक मला शिबीरातून काढण्यात आले. त्यामुळे मला ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या पात्रता स्पर्धेत सहभागी होता आले नाही, असा आरोप दत्तू भोकनळ यांनी केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने या प्रकाराची दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी दत्तू भोकनळ याने केली आहे.

दत्तू भोकनळ हा 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रोइंग प्रकारात पात्र ठरलेला एकमेव भारतीय खेळाडू होता.दत्तू भोकनळ हा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोट्याशा गावचा आहे. त्याने नौकानयन या क्रीडाप्रकारात भारताचं नाव उज्वल केलं आहे. दत्तूने 2014 मध्ये त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. मग 2015 मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले. त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोइंगमध्ये भारतासाठी अनेक पदके जिंकवून दिले आहेत. 2017 मध्ये त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. तर 2020 मध्ये दत्तू भोकनळ अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी

महाराष्ट्राचा रोलिंगपटू दत्तू भोकनळने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. अंगात 104 इतका ताप असतानाही दत्तूने आशियाई गेम्समध्ये भारतीय टीमला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. सरकारने या खेळाला अजून प्रोत्साहन दिले पाहिजे ज्यामुळे देशाला मेडल मिळू शकतील, असं मत दत्तू भोकनळने त्यावेळी व्यक्त केले होते.

संबंधित बातम्या:

रोईंगपटू दत्तू भोकनळवर फसवणुकीचा गुन्हा

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.