AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम, फसवणूक अन् ब्लॅकमेलिंगच्या सावटाखाली आयकर अधिकाऱ्याने संपले जीवन, साखरपुड्याच्या दिवशीच असे काय घडले?

आयकर विभागत अधिकारी असलेल्या हरेकृष्ण पांडे होणाऱ्या वधूकडून छळामुळे प्रचंड मानसिक तणावात आले. त्यामुळे लग्नाच्या दिवशीच त्यांनी आत्महत्या केली. नाशिकमधील उत्तमनगर परिसरात गळफास घेत टोकाचे पाऊल त्यांनी उचलले.

प्रेम, फसवणूक अन् ब्लॅकमेलिंगच्या सावटाखाली आयकर अधिकाऱ्याने संपले जीवन, साखरपुड्याच्या दिवशीच असे काय घडले?
marriageImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 18, 2025 | 9:18 AM
Share

Crime News: नाशिकमध्ये प्रेम प्रकरणात फसवणूक झाल्याचा वेगळाच प्रकार समोर आला. नाशिक शहरातील आयकर कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये लग्न ठरले होते. त्यानंतर साखरपुडाही वाराणसीत झाला. परंतु त्या दिवशी आणि त्यानंतर जे झाले, तो प्रकार धक्कादायक होता. त्या प्रकारानंतर आयकर अधिकारी प्रचंड तणावात आला. त्या तणावातून त्याने नाशिकमध्ये आपले जीवन संपवले.

नेमके काय घडले

नाशिकमधील आयकर कार्यालयात हरेकृष्ण पांडे हे अधिकारी कार्यरत आहे. त्यांच्या लग्नासाठी वधू संशोधन मोहीम सुरु होती. उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील मुलगी त्यांनी पाहिली. त्यानंतर त्यांचे लग्न ठरले. सर्व काही सुरळीत सुरु होते. भावी वैवाहिक जीवनाची स्वप्न ते पाहत होते. त्यांचा साखरपुडाही निश्चित करण्यात आला. वाराणसीमध्ये त्यांचा साखरपुडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु साखरपुड्यातच त्यांची वधू होणाऱ्या मुलीने तिच्या प्रियकराला मिठी मारली. त्यामुळे त्या मुलीचे प्रेमप्रकरण उघड झाले. प्रेमप्रकरण उघड झाल्यानंतर ती वधू हरेकृष्ण पांडे यांना धमकी देऊ लागली. “लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन”, अशी धमकी त्या वधूकडून आयकर विभागातील अधिकाऱ्याला दिली गेली. त्यामुळे पांडे प्रचंड तणावात आले.

तणावातून संपवले जीवन

हरेकृष्ण पांडे होणाऱ्या वधूकडून छळामुळे प्रचंड मानसिक तणावात आले. त्यामुळे लग्नाच्या दिवशीच त्यांनी आत्महत्या केली. नाशिकमधील उत्तमनगर परिसरात गळफास घेत टोकाचे पाऊल त्यांनी उचलले. बायको होणाऱ्या युवतीकडून सतत ब्लॅकमेल आणि मानसिक त्रास होत असल्याने त्यांनी हे टोकाचा पाऊल उचलले. या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

प्रेम, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या सावटाखाली एका अधिकाऱ्याने आपले आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. लग्नात फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येऊ लागल्यामुळे पालकांसमोर चिंताही निर्माण झाली आहे.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.