Video : नाशिक-औरंगाबाद मार्गावर अपघात, कारच्या धडकेनंतर बाईक जळून खाक! नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचला

Nashik Accident : अपघातानंतर नाशिक औरंगाबाद मार्गावर एकच गोंधळ उडाला होता. स्थानिकांच्या मदतीनं यावेळी बचावकार्य करण्यात आलं.

Video : नाशिक-औरंगाबाद मार्गावर अपघात, कारच्या धडकेनंतर बाईक जळून खाक! नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचला
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 5:56 PM

नाशिक : अपघातानंतर गाड्यांना आग लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चंद्रपुरात (Chandrapur Track Accident News) दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातनंतर आग लागून 9 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना जाती असतानाचा आता नाशिकमध्येही (Nashik Accident News) भीषण अपघात घडला. बाईक आणि कार (Bike-car accident) यांची एकमेकांना धडक होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झालाय. त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या भीषण अपघातानंतर दुचाकीनं पेट घेतला. बघता बघता ही दुचाकी आगीत जळून पूर्णपणे खाक झाली होती. तर गाडीचंही मोठं नुकसान या अपघातामध्ये झालं. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली. सध्या जखमी दुचाकी स्वारावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमका कुठे झाला अपघात?

नाशिक-औरंगाबाद हायवेवर नांदगाव जवळ हा भीषण अपघात घडला. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानं गा अपघात घडला. कारने धडक देताच दुचाकीस्वार खाली पडला आणि त्यानंतर शॉर्टसर्किट होऊन दुचाकीनं पेट घेतला. भर रस्त्यात यावेळी दुचाकी पेटल्याचा थरार प्रत्यक्षदर्शींनी अनुभवलाय. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली आहे. मात्र अपघातानंतर नाशिक औरंगाबाद मार्गावर एकच गोंधळ उडाला होता. स्थानिकांच्या मदतीनं यावेळी बचावकार्य करण्यात आलं.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

वाशिमध्येही दुचाकींचा अपघात

दरम्यान, मोटारसायकल अपघातात एक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना वाशिममध्ये घडली. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सिंगद ते सोमनगर रोडवर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. या धडकेत खाली पडलेल्या आकाश राठोड यांला मागून भरधाव वेगानं येणाऱ्या ट्रॅकने चिरडलं आणि त्याचा जागीच जीव गेला. तर एक जण या अपघातात जखमी झालाय. सध्या जखमी दुचाकीस्वारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वाशिमनंतर आज सकाळीच नाशिकमध्येही दुचाकीचा अपघात झाल्यानं खळबळ उडाली होती. दुचाकींच्या अपघाताचं सत्र शनिवारी सकाळी पाहायला मिळालंय. दरम्यान, शनिवार अपघातवार ठरलाय. कारण तिकडे धारवाडमध्येही भीषण अपघातात तब्बल आठ जणांचा जीव गेल्याची घटना समोर आलीय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.