चोरट्यांचे लक्ष आता पैठण्यांकडे, कोट्यवधींची चोरी करताना पुरावाही नेला सोबत

Nashik Crime News: दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याची घटना लक्षात येताच येवला शहर पोलिसांना माहिती दिली गेली. त्यानंतर येवला शहर पोलीस व मनमाड उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरीचा घटनाक्रम पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला.

चोरट्यांचे लक्ष आता पैठण्यांकडे, कोट्यवधींची चोरी करताना पुरावाही नेला सोबत
दुकानात चोरीचा पुरावा तपासताना श्वान पथक
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 3:00 PM

Nashik Crime News: चोरांना चोरीसाठी नेहमी मौल्यवान वस्तू हव्या असतात. कपड्यासारखी चोरी मोठे चोरटे सहसा करत नाही. परंतु नाशिक जिल्ह्यातील चोरटे वेगळेच निघाले. जगभर प्रसिद्ध असलेल्या येवल्यातील पैठणीकडे चोरट्यांचे लक्ष गेले. त्यानंतर कोट्यवधी रुपये किंमतीच्या पैठणी आणि साड्या घेऊन चोरटे पसार झाले. या चोरट्यांनी सोबत जाताना पुरावे नेले. यामुळे पोलिसांसमोर आता या चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.

असा उघड झाला चोरीचा प्रकार

पैठणीचे माहेरघर म्हणून नाशिक जिल्ह्यातील येवलाची ओळख आहे. येवल्यातील पैठणी देशभर जातात. राज्यातील महिलांनी या पैठणीची क्रेज आहे. येवला शहरातील या पैठणींकडे चोरट्यांचे लक्ष गेले. अहिल्यानगर-मनमाड राज्य मार्गावर येवला रेल्वे टेशनसमोर असलेल्या लक्कडकोट पैठणी दुकानात धाडसी चोरी झाली. दुकानाच्या मागील बाजू असलेली खिडकी तोडून पैठणी कारखान्यातून दुकानात प्रवेश केला एक लाख, दीड लाख आणि दोन लाख रुपये किमतीच्या पैठण्या, साड्या चोरट्यांनी चोरून नेल्या. त्याची एकत्रित किंमत दीड ते दोन कोटी रुपये आहे.

चोरट्यांनी सोबत नेले पुरावे

सकाळी दुकान उघडल्यानंतर चोरी झाल्याची घटना लक्षात येताच येवला शहर पोलिसांना माहिती दिली गेली. त्यानंतर येवला शहर पोलीस व मनमाड उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरीचा घटनाक्रम पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरून नेल्याची बाब उघड झाली. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली. मात्र त्यांना त्या ठिकाणीही अपयश आले.

हे सुद्धा वाचा

आता या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले. मात्र दीड ते दोन कोटी रुपयांच्या पैठण्या चोरुन नेल्यामुळे येवल्यातील पैठणी दुकानदार व उद्योजकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. दुकानदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.