Nashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद

इगतपुरीतील घटनेबाबत पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून आजची घटना घडली आहे. नांदगाव सदो या गावात गुरुवारी एक गटाची भांडणे झाली होती. त्यातून आजच्या मारामारीची घटना घडली. पोलिसांकडून इगतपुरी शहरात सध्या शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे.

Nashik Crime : इगतपुरी शहरात गॅंगवारचा भडका एकाची हत्या तर एक जण गंभीर जखमी, संचारबंदी लागू बाजारपेठा बंद
सांगलीतील विट्यात दोन चिमुरड्यांसह विवाहितेची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 10:02 PM

शैलेश पुरोहित / नाशिक : इगतपुरी शहरात पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली आहे. या वादातून एकाची हत्या(Murder) झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. नागरीक प्रचंड दहशतीखाली आहेत. पोलिसांनी इगतपुरी शहरात संचारबंदी लागू केली असून, घटनेनंतर मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली. राहुल साळवे(Rahul Salve) असे मयत तरुणाचे नाव असून तो एक सराईत गुंड होता. त्याच्यावर रेल्वे पोलिसात व शहर पोलिसात विविध गुन्हे दाखल आहेत. संशयित 20 ते 25 आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. सदो गावात गुरुवारी घडलेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर आजची गँवॉरची घटना घडली आहे. (One killed, one seriously injured in Igatpuri gang war)

हाणामारीत वाहनांचे मोठे नुकसान

इगतपुरी शहरातील गायकवाड नगर परिसरात दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दगडफेक आणि तलवारी, कोयते, चॉपरने राडा झाला आहे. या घटनेमध्ये 3 चारचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासह 5 मोटारसायकलींचे देखील मोठे नुकसान झाले आहे. काळू सदगिर यांच्या 5 घरांना ह्या घटनेमुळे चांगलाच फटका बसला असून पत्रे, दरवाजे तुटले आहे. काचा फुटल्या असून खिडक्या, पत्रे आणि दरवाजावर तुफान दगडफेक झाली आहे. दरवाजा उघडत नाही म्हणून दरवाज्यावर तलवारीचे वार करून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांचे नागरिकांना आवाहन

इगतपुरीतील घटनेबाबत पोलिसांकडून योग्य ती कार्यवाही सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून आजची घटना घडली आहे. नांदगाव सदो या गावात गुरुवारी एक गटाची भांडणे झाली होती. त्यातून आजच्या मारामारीची घटना घडली. पोलिसांकडून इगतपुरी शहरात सध्या शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. नागरिकांकडे याबाबत सीसीटीव्ही फुटेज अथवा अन्य कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर न घाबरता पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. संबंधितांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. (One killed, one seriously injured in Igatpuri gang war)

इतर बातम्या

Kalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Nanded Crime : नांदेडमधील अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार, आरोपी अटक

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.