महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच नाशिकमध्ये मारहाण

महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच चक्क मारहाण (Police beaten) केल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे.

महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच नाशिकमध्ये मारहाण
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 11:32 AM

नाशिकः महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच चक्क मारहाण (Police beaten) केल्याची घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police beaten in Nashik, Obstruction of investigation of female molestation)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिलांची छेडछाड केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. विशेष म्हणजे ही तक्रार पोलिस हवालदार सागर जगन्नाथ जाधव यांनी दिली होती. तक्रारीचा तपास करण्यासाठी पोलिस संत कबीरनगर झोपडपट्टीत भागात गेले. याप्रकरणी पोलिसांनी अजय घुले या संशयिताला पूर्वीच अटक केली आहे. त्याच्या सांगण्यावरून संशयित महेश कटारिया याच्यावरही सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतच्या तपासाची विचारपूस पोलिसांनी कटारिया याच्याकडे केली. तेव्हा त्याने जोरजोरात आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले. त्याची आई, बहीण आणि मित्रांना चक्क रॉकेलची कॅन घेऊन बोलावले. तेव्हा एक महिला यावेळी डिझेलची कॅन घेऊन आली. परिस्थिती हाताबाहेर जात होती. त्यामुळे पोलिसांनी पुढे होत डिझेलची कॅन हातात घ्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आरोपीने अंगावर डिझेल ओतून घेतले. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाच मारहाण सुरू केली. फिर्यादी असणारे पोलीस हवालदार सागर गुंजाळ व पथकातील कर्मचाऱ्यांना त्याने चापटाने मारहाण केली. गलिच्छ शिवीगाळ केली. शिवाय त्यांना धमकीही दिली. त्यामुळे पोलिसांनी गंगापूर पोलिस ठाण्यात महेश कटारियाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस आयुक्तालयात घातला गोंधळ

नाशिकमध्ये दोनच दिवसांपूर्वी चक्क पोलिस आयुक्त कार्यालय आणि न्यायदंडाधिकारी कक्षामध्ये एका पिता-पुत्राने गोंधळ घातल्याचाही प्रकार घडला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 4 तथा सहाय्यक दंडाधिकारी समीर शेख यांच्या कार्यालयात ही घटना झाली होती. यावेळी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांमधील चॅप्टर केस क्रमांक 313/ 2021 मधीलअक्षय प्रकाश साळवे व इतर या प्रकरणात प्रतिबंधक कारवाईची सुनावणी सुरू होती. त्यावेळी जेल रोड, मगर चाळ येथील शफीद्दीन कमृद्दिन काझी आणि त्यांची मुले रफिक शफीद्दीन काझी व रिझवान शफीद्दीन काझी यांनी विनापरवानगी न्यायदान कक्षात प्रवेश केला आणि सुनावणीमध्ये अडथळा आणला. पोलिसांनी या पिता-पुत्रांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्यांनी आरडाओरडा करत शिवीगाळ सुरू केली. जोरजोराने घोषणा दिल्या. पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांना ढकलून दिले. याप्रकरणीही या पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. (Police beaten in Nashik, Obstruction of investigation of female molestation)

इतर बातम्याः

‘शरियत’ सारखा कायदा आणा, मगच बलात्कार थांबतील; नाशिकमध्ये राज ठाकरेंचा सल्ला

नाशिकच्या एंजलचा भीमपराक्रम; खवळलेल्या समुद्राशी झुंज देत 14 तास 23 मिनिटांत 45.1 किमीची इंग्लिश खाडी पार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.