नाशिकमध्ये रॅगिंग झाल्यानं डॉक्टरच्या मृत्यूचा गंभीर आरोप, कॉलेजकडून मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा

नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत डॉक्टरच्या कुटुंबाने रॅगिंगमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय.

नाशिकमध्ये रॅगिंग झाल्यानं डॉक्टरच्या मृत्यूचा गंभीर आरोप, कॉलेजकडून मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 3:43 PM

नाशिक : नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत डॉक्टरच्या कुटुंबाने रॅगिंगमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. डॉ. स्वप्निल महारुद्र शिंदे असं या मृत डॉक्टरांचं नाव आहे. पीडित डॉक्टर विद्यार्थी गायनॉकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच या विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंगमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे वैद्यकीय महाविद्यालयानं मात्र पीडित डॉक्टरी मानसिक स्थिती खराब असल्याच म्हणत कुटुंबाचे आरोप फेटाळले आहेत.

मृत डॉक्टर स्वप्निल महारुद्र शिंदे यांच्या कुटुंबाने रॅगिंग करणाऱ्या 2 मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.

कॉलेजकडून मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा

कॉलेज प्रशासनाने मात्र, कुटुंबाच्या आरोपांचं खंडण केलंय. आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळो वेळी सहकार्य केल्याचा दावा कॉलेज प्रशासनाने केलाय. तसेच मृत विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू असल्याचंही कॉलेज प्रशासनाने म्हटलंय. मानसिक स्थिती ठीक नसल्याने मृत डॉक्टर विद्यार्थ्यांच्या आईला मुलासोबत होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिल्याचाही दावा कॉलेजने केलाय.

हेही वाचा :

आतल्या वेदनांची जखम, नैराश्याने घात, ‘छावा’ संघटनेचा तालुकाध्यक्ष, वैयक्तिक आयुष्यातील संघर्षापुढे हार, टोकाचं पाऊल

जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू, 28 वर्षीय पतीचा अंगणातील झाडाला गळफास

वयोवृद्ध महिलेला निद्रानाश, घरात सून-नात असताना बाल्कनीत टोकाचं पाऊल, आत्महत्या की घातपात? नागपुरात खळबळ

व्हिडीओ पाहा :

Suspicious death of a medical student cum doctor in Nashik family allege ragging

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.