खाणीतल्या तळ्यात चिमुकल्या भावा-बहिणीसह त्यांच्या पित्याचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ, नेमकं काय घडलं?

नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील 3 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतकांमध्ये एका पुरुषासह दोन लहान मुलांचा समावेश आहे.

खाणीतल्या तळ्यात चिमुकल्या भावा-बहिणीसह त्यांच्या पित्याचा मृतदेह, नाशिकमध्ये खळबळ, नेमकं काय घडलं?
लग्नानंतर प्रेमी जोडप्याची विष प्राशन करुन आत्महत्या
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 5:22 PM

नाशिक : नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दगडाच्या बंद खाणीतील तळ्यात एकाच कुटुंबातील 3 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतकांमध्ये एका पुरुषासह दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमागे नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण पित्याने आपल्या दोन मुलांसह बंद खाणीतील तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संबंधित घटना ही नाशिकच्या सिद्ध पिंपरी गावात घडली आहे. एकाच कुटुंबातील 3 जणांचे अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. तसेच या दुखद घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. वडिलासह दोन मुलांचा अशाप्रकारे मृतदेह सापडणे हे धक्कादायक असल्याची चर्चा सुरु असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खाणीत सापडलेल्या मृतदेहांमध्ये 34 वर्षीय शंकर महाजन, त्यांचा 4 वर्षीय मुलगा पृथ्वी महाजन आणि 3 वर्षीय मुलगी प्रगती महाजन यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण ही एक आत्महत्येची घटना असल्याचा पोलिसांना संशय आहे.

बाळाची हत्या करुन आईची आत्महत्या

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी अशीच काहिशी घटना समोर आली होती. बाळाची हत्या करुन आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. महिलेसोबतच बाळाचाही मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र महिलेच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बाळाची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांना सुसाईड नोट आढळून आली आहे. मात्र सुसाईड नोटमध्ये या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरु नये, असा उल्लेख करण्यात आल्याची माहिती आहे.

आजारपणाला कंटाळून विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

दुसरीकडे चार दिवसांपूर्वी एका 25 वर्षीय महिलेने आजारपणाला कंटाळून चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये समोर आली होती. श्रीरामपूरच्या टाकळीमियात ही घटना घडली होती. विद्या दिलीप कडू (वय 25) आणि सिध्दी दिलीप कडू (वय 4) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीचे नाव आहे. विद्या ही शाळेत असल्यापासून थोडीशी मनोरुग्ण होती. तिला तेव्हापासून औषधोपचार चालू होते.

दोन मुलांच्या हत्येनंतर आईची आत्महत्या

दरम्यान, दोन चिमुकल्या मुलांची हत्या करुन महिलेने गळफास घेतल्याची घटना नुकतीच राजस्थान राज्यातील बाडमेरमध्ये उघडकीस आली होती. सहा वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांच्या मुलाचा जीव घेऊन विवाहितेने स्वतःचंही आयुष्य संपवलं. हुंड्याच्या दबावातून होणाऱ्या त्रासाला कंटाळून बहिणीने सामूहिक आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून पुढील तपास सुरु केला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील वाकलपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली होती. रसाल कंवर हिचा विवाह सात वर्षांपूर्वी माधव सिंहसोबत झाला होता. माधव ट्रक चालक आहे. माधव आणि रसाल यांना सहा वर्षांची जसू ही मुलगी आणि तीन वर्षांचा विक्रम हा मुलगा आहे. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत जेव्हा रसाल कंवरच्या घरातून कुठलीही हालचाल जाणवली नाही, त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिलं असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रसाल आणि तिची दोन्ही मुलं गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

हेही वाचा :

रात्रीस खेळ चाले, एकाच रात्री दोन ATM फोडले, नागरिकांना चोराची चाहूल, पोलिसांनी शिताफीने मुसक्या आवळल्या, भयानक थरार

करुणा शर्मांच्या मुंबईतील घराची तपासणी, बीड पोलिसांचं पथक मुंबईत; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.