VIDEO : नाशिकमध्ये महिलेचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न, पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एका महिलेने पोलीस आयुक्तालयाबाहेरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाता प्रयत्न केला.

VIDEO : नाशिकमध्ये महिलेचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न, पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 5:04 PM

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असताना नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एका महिलेने पोलीस आयुक्तालयाबाहेरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस तक्रार घेत नसल्याचे आरोप या महिलेने केला आहे. त्यामुळेच आपण आत्मदहन करत असल्याचं महिलेने म्हटलं आहे. राजलक्ष्मी पिल्ले असं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. या महिलेला पोलिसांनी आत्मदहन करण्यापासून रोखलं.

नेमकं प्रकरण काय?

आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला राजलक्ष्मी पिल्ले या युवा स्वाभिमान संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. राजलक्ष्मी यांनी आपल्या पतीसोबत नाशिक पोलीस आयुक्तलयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून आपल्याला मारहाण झाली. याबाबत आपण इंदिरा नगर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार करण्यासाठी जावूनही पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यात आली नाही, असा आरोप राजलक्ष्मी यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाबाहेर पतीसोबत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

महिलेचा आत्मदहन करतानाचा व्हिडीओ व्हायरल

राजलक्ष्मी यांचा आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत राजलक्ष्मी स्वत:वर कशाप्रकारे पेट्रोल ओतून घेतात ते स्पष्टपणे दिसत आहे. तसेच पोलीस राजलक्ष्मी आणि त्यांचे पती दोघांना आत्मदहन करण्यापासून रोखत आहेत. यावेळी राजलक्ष्मी आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. “माझ्यावर अन्याय झाला आहे. मी थांबनार नाही. मी पोलीस स्टेशनला जाऊनही माझी तक्रार नोंदवली गेली नाही. मी थांबणार नाही”, असं राजलक्ष्मी बोलताना दिसत आहेत. अखेर राजलक्ष्मी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : एसटी चालकाने आधी डिझेल भरलं, नंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विचित्रप्रकार, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी नेमकं हेरलं आणि…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.