Nashik Crime|भयंकर आक्रीत, चौथीतल्या मुलीला जंगलात फाशी देण्याचा प्रयत्न; पंचक्रोशीत खळबळ!

गांगुर्डे यांची अगोदरच नुसत्या कल्पनेने घाबरगुंडी उडाली होती. शेवटी त्यांनी धाडसाने आवाजाच्या दिशेने जात पाहिले, तर समोरचे दृश्य धडकी भरवणारे होते.

Nashik Crime|भयंकर आक्रीत, चौथीतल्या मुलीला जंगलात फाशी देण्याचा प्रयत्न; पंचक्रोशीत खळबळ!
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 9:28 AM

नाशिकः नाशिकमध्ये चक्क एका 6 वर्षांच्या मुलीला फाशी देण्याचा धक्कादायक प्रयत्न झाला. दिंडोरी तालुक्यातल्या देहरेवाडी जंगलात ही खळबळजनक घटना घडली. जंगलात गुरे चारायला गेलेल्या गुराख्याला हा प्रकार दिसला आणि नंतरच आरिष्ट टळले. सध्या या मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. मात्र, फाशी देणारा व्यक्ती पसार झाला असून, तो नेमका कोण होता, त्याने हे कृत्य कशासाठी याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अती वेगाने सुरू केला आहे.

नेमका प्रकार काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातल्या देहरेवाडी जंगलात शुक्रवारी, 7 जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही अतिशय भयंकर घटना घडली. देहरेवाडी परिसरातील अनेक गुरे जंगलात चरण्यासाठी आणली जातात. कालही देहरेवाडी येथील गुराखी नारायण गांगुर्डे आपली गुरे घेऊन जंगलात आले होते. मात्र, त्यांच्या कानावर कसला तरी आवाज पडला. त्यांची उत्सुकता चाळवली. त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यांना अगदोर जंगलातील हिंस्त्र प्राणी, जनावरे असतील असे वाटले. त्यामुळे त्यांची भीती वाढली होती. कारण या जंगलात नेहमीच हिंस्त्र प्राण्याचा वावर असतो.

डोळ्यांसमोर आक्रीत

गांगुर्डे यांची अगोदरच नुसत्या कल्पनेने घाबरगुंडी उडाली होती. शेवटी त्यांनी धाडसाने आवाजाच्या दिशेने जात पाहिले, तर समोरचे दृश्य धडकी भरवणारे होते. एक व्यक्ती एका लहान मुलीला फासावर लटकवत होता. हे पाहता गांगुर्डे यांनी जोरदार आरडाओरडा सुरू केला. आणि तितक्याच वेगाने त्या व्यक्तीच्या दिशेने धाव घेतली. हे पाहून समोरच्या व्यक्तीने मुलीला फास देणारा दोर सोडून जंगलात पोबारा केला. गांगुर्डे यांनी मुलीच्या गळ्याचा फास काढला. तिला गावात आणले आणि घटनेचे माहिती पोलीस पाटील साहेब साळवे यांना दिली. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. या मुलीवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

मुलीची ओळख पटली

पोलिसांना रात्री उशिरा या मुलीची ओळख पटवण्यात यश आले. ही मुलगी मुंगसरा या गावातली आहे. ती सध्या चौथ्या वर्गात शिकते. मात्र, हे कृत्य कोणी आणि का केले याचा शोध घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. मुलीकडूनही त्या व्यक्तीची माहिती घेतली जात आहे. हा नरबळीचा वगैरे तरी प्रकार नसावा ना, अशी भीतीही अनेकजण व्यक्त करत आहेत. मात्र, या घटनेने देहरेवाडी पंचक्रोशी हादरली असून, पोलिसांनी तातडीने गुन्हेगारा बेड्या ठोकाव्यात अशी मागणी होत आहे.

इतर बातम्याः

Health University|आरोग्य विद्यापीठात यावर्षी 7 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम होणार सुरू; 670 कोटींचा प्रकल्प

Nashik Jobs|संकटात नोकरीची सुवर्णसंधी, कुठे अन् कशी होतेय भरती, जाणून घ्या!

Nashik Train|आनंदवार्ता: नाशिक-भुसावळ-इगतपुरी मेमू 10 जानेवारीपासून होणार सुरू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.