महिलेला तब्बल दोन कोटी रुपयांना गंडा, फसवणुकीची घटना ऐकून पोलिस सुद्धा चक्रावले, कोणत्या कारणासाठी केली फसवणूक?
ओळक करून विश्वास संपादन करून फसवणूक करण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामध्ये सोलापूरात तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
सोलापूर : सोलापूरमध्ये एका महिलेची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची बाब समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीत कस्टमच्या सोन्याचा विषय असल्याने फसवणुकीची चर्चा आता संपूर्ण सोलापूरात होऊ लागली आहे. त्यात पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने मोठं रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई येथील कस्टम विभागातील सोने कमी किमतीत देतो म्हणून एका महिलेची दोन कोटी रुपयांना फसवणूक केल्याची घटना घडली आहे.कमी किमतीत सोनं देतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तिघा जणांविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरती गोपाळ सेवानी असं फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. विजापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुण गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरती गोपाळ सेवानी यांनी दिलेल्या तक्रारीवरुण विजापूर पोलिसांनी ज्योती गायकवाड, गणेश तांबळे, योगेश अय्यर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरती सेवानी यांची ज्योती गायकवाड हिच्या सोबत ओळख झाली होती. ज्योती हिने आरतीला शंभर ग्राम गोल्डचा एक कॉइन दिला होता.
आरतीने हा गोल्ड कॉइन योगेश अय्यर याने मुंबई येथून आणून दिल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्याने माझा भाऊ कस्टम विभागात आहे. त्यामुळे कमी किमतीत सोने देऊ शकतात असे आमिष दाखवून आरती सेवानी यांच्याकडून दोन कोटी रुपयांची रक्कम घेतल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
यामध्ये आरती यांनी ज्योती या महिलेवर विश्वास ठेऊन दोन कोटी रुपये दिले होते. मात्र काही दिवसांनी आरती सेवानी यांनी सोने, पैसे मागूनही दिले नाही. मात्र, त्यानंतर काही धनादेश दिले मात्र ते देखील बँकेत वठल्या गेल्याने आरती यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर आरती सेवानी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात झाल्याचे लक्षात येताच विजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून विजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिकचा तपास केला जात आहे. मात्र या घटनेत मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.