Delhi Crime : आजारी आईसाठी मदत मागायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार

पीडित मुलीचे संपूर्ण कुटुंब मूळचे यूपीचे आहे. कामानिमित्त हे कुटुंब दिल्लीत वास्तव्याला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या आईची तब्येत अचानक बिघडली. यामुळे आईने शेजारच्या अरुणकडून औषध आणण्यास मुलीला पाठवले.

Delhi Crime : आजारी आईसाठी मदत मागायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार
CRIME
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:56 PM

दिल्ली : आई आजारी असल्याने आईसाठी मदत मागायला गेलेल्या 12 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याने बलात्कार(Rape) केल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना दिल्लीतील पांडव नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पांडवनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को(POSCO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. अरुण असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Neighbor rapes minor girl in delhi who goes to seek help for sick mother)

अज्ञातस्थळी नेऊन बलात्कार केला आणि वस्तीबाहेर सोडून पळाला

पीडित मुलीचे संपूर्ण कुटुंब मूळचे यूपीचे आहे. कामानिमित्त हे कुटुंब दिल्लीत वास्तव्याला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या आईची तब्येत अचानक बिघडली. यामुळे आईने शेजारच्या अरुणकडून औषध आणण्यास मुलीला पाठवले. मुलगी शेजाऱ्याच्या घरी गेली असता आरोपी अरुणने तिला औषध देण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत ​​वस्तीबाहेर पळ काढला. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापे टाकत असून लवकरच आरोपी पकडले जातील, असे पोलिसांनी सांगितले.

पिंपरी चिंचवडवडे तरुणीवर बलात्कार

मॅट्रीमोनियल साईटवर ओळख झालेल्या तरणाने एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली होती. पीडित तरुणीने लग्न जमवण्यासाठी मॅट्रिमोनियल साईटवर आपले प्रोफाईल अपलोड केले होते. तेथे तिची आरोपीशी ओळख झाली. दोघेही दररोज चॅटिंग करु लागले, भेटू लागले. यानंतर तरुणाने तरुणीला लग्नाची मागणी घातली. तरुणीने याबाबत घरच्यांना माहिती दिली. घरच्यांनीही लग्नाला संमती दिल्याने दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. यादरम्यान बिझनेस स्टार्टअपसाठी तरुणीकडून 8 लाख रुपयेही घेतले. सप्टेंबरमध्ये वाकड परिसरातील एका नामांकित हॉटेलच्यामागे गाडी थांबवून आरोपी तरुणीने बळजबरीने तरुणीवर कारमध्येच बलात्कार केला. यानंतर आरोपीने तरुणीला भेटणे कमी केले.

एक दिवस आई कोविड झाल्याचे सांगत तरुण मध्य प्रदेशात गेला. पुण्यात आलो की भेटतो असे त्याने तरुणीला सांगितले होते. त्यानंतर त्याचा मोबाईलही बंद येत होता. मात्र बरेच दिवस झाले तरी तरुण आला नाही म्हणून तरुणी तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेली असता आरोपी फ्लॅट सोडून गेल्याचे तिला कळले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने वाकड पोलीस तक्रार दाखल केली. यानंतर तपासाची सूत्रे हलवत पोलिसांनी आरोपीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. (Neighbor rapes minor girl in delhi who goes to seek help for sick mother)

इतर बातम्या

Google CEO Sundar Pichai: कालच पद्मभूषण मिळालेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल; नेमकं प्रकरण काय?

Kolkata Murder: कपडे सुकवण्यावरून भांडण, कोलकात्यात मोठ्या भावाकडून धाकट्या भावाची हत्या

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.