सोशल मीडियावरुन ओळख, तरुणीवर बलात्कार, अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल

बलात्कारानंतर आरोपी पीडित महिलेला ब्लॅकमेल करू लागला. धमकावून त्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावरुन ओळख, तरुणीवर बलात्कार, अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 2:34 PM

नवी दिल्ली : सोशल मीडियावरुन ओळख झालेल्या महिलेवर बलात्कार करुन ब्लॅकमेल केल्याची घटना राजधानी दिल्लीतील समयपूर बदली परिसरात समोर आली आहे. पीडितेवर बलात्कार, मारहाण आणि धमकावल्या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांच्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या कुटुंबासह दिल्लीच्या रोहिणी येथील सेक्टर 18 मध्ये असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती हरियाणातील हिसार येथील साहिल नामक तरुणाच्या संपर्कात आली. काही दिवसांतच त्यांची मैत्री झाली.

नेमकं काय घडलं?

दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. मात्र तिचं लग्न अन्य तरुणाशी झालं. काही काळानंतर पीडितेचा घटस्फोट झाला, त्यानंतर साहिलने तिच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. एके दिवशी तो तिच्या घरी आला. तिला गुंगीचे औषध देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील फोटो काढले, असा आरोप केला जात आहे.

बलात्कारानंतर साहिल पीडित महिलेला ब्लॅकमेल करू लागला. धमकावून त्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल

दरम्यान, राजस्थानच्या चुरुमध्ये राहणाऱ्या एका महिलेने अश्लील व्हिडिओ बनवून आपल्याला ब्लॅकमेल करत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने अशोक विहार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, शेजारी राहणाऱ्या जोडप्याने तिला फसवून हॉटेलमध्ये नेले. तिथे तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्याचा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर तो आणि त्याच्या पत्नीने महिलेला ब्लॅकमेल केले. धमकावून तिच्यावर बलात्कार केला जात असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

इतकंच नाही तर आरोपीने अश्लील व्हिडीओ त्याच्या आणखी एका मित्रालाही फॉरवर्ड केला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही त्या व्यक्तीने तिला द्यायला सुरुवात केली. पीडितेचा मानसिक छळ झाल्याने तिने अशोक विहार पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून 45 वर्षीय आरोपीला अटक केली. तोही राजस्थानच्या चुरुचा रहिवासी आहे.

संबंधित बातम्या :

वेडाच्या भरात कुऱ्हाडीने अंदाधुंद हल्ला, दोन मुली, सख्खा भाऊ ठार, पोलीस निरीक्षक-रिक्षा चालकालाही संपवलं

एकतर्फी प्रेमातून बलात्कार, तरुणीसह कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

व्हिस्की खरेदीच्या नादात दादरमधील 74 वर्षीय अभिनेत्रीची फसवणूक, 3 लाखांचा ऑनलाईन गंडा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.