Kolkata Murder: कपडे सुकवण्यावरून भांडण, कोलकात्यात मोठ्या भावाकडून धाकट्या भावाची हत्या

कृष्णा आणि त्याच्या मुलगा गोपाळला रस्त्यावर मारहाण करीत होते. शेजाऱ्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी गोपाळला वाचवले. गंभीर अवस्थेत गोपाळला व्हीआयपी रोडवरील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Kolkata Murder: कपडे सुकवण्यावरून भांडण, कोलकात्यात मोठ्या भावाकडून धाकट्या भावाची हत्या
लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, आंध्र प्रदेशमध्ये कार-लॉरी अपघातात 9 ठार
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 4:29 PM

कोलकाता : कपडे सुकवण्यावरुन झालेल्या क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावाची बेदम मारहाण करीत हत्या(Murder) केल्याची धक्कादायक घटना 24 जानेवारी रोजी कोलकाता विमानतळाजवळील विद्यासागर पल्ली भागात घडली आहे. गोपाळ मंडल(Gopal Mandal) असे मृताचे नाव आहे. तो पालिकेचा हंगामी कर्मचारी आहे. गोपाल मंडल यांच्या पत्नीचा त्यांचा मोठा भाऊ कृष्णा मंडल यांचा मुलगा ऋतिक, पत्नी पूर्णिमा आणि मुलगी प्रिया यांच्याशी वाद झाला होता. गोपाल मंडल यांच्या पत्नीला रस्त्यावर बेदम कथित मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. गोपाळने याला विरोध केला आणि भांडण सुरू झाले, त्यानंतर ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. भक्त कृष्ण मंडल, अनिमा मंडल, प्रिया मंडल आणि ऋतिक मंडल अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. (Older brother kills younger brother over clothes dispute in Kolkata)

कृष्णा आणि त्याच्या मुलगा गोपाळला रस्त्यावर मारहाण करीत होते. शेजाऱ्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी गोपाळला वाचवले. गंभीर अवस्थेत गोपाळला व्हीआयपी रोडवरील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक लोकांनी आरोपी कृष्णाच्या कुटुंबावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

भावांमध्ये नेहमीच व्हायचे वाद

घरात टॉवर लावण्यावरून दोन भावांमध्ये वाद सुरु झाला होता. कुटुंबात नेहमीच कुरबुरी सुरु असायच्या. दोन्ही भावांची कुटुंबे लहानसहान गोष्टीवरून एकमेकांशी भांडत असत. शेजाऱ्यांनीही अनेकदा हस्तक्षेप केला, मात्र गेल्या सोमवारी पुन्हा वाद निर्माण झाला. कपडे सुकवण्यावरून सुरू झालेल्या भांडणाचे रुपांतर मोठ्या हाणामारीत झाले.

आरोपींना कठोर शिक्षा देण्याची शेजाऱ्यांची मागणी

आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी शेजाऱ्यांनी केली आहे. तसेच आरोपींना परिसरात येऊ देणार नाही असेही शेजाऱ्यांनी नमूद केले. मंडल कुटुंबात वारंवार वाद होते. आम्ही नेहमी हस्तक्षेप करुन वाद मिटवायचा प्रयत्न करायचो. त्या दिवशी मोठा भाऊ गोपाळला जमिनीवर आपटत होता. आम्ही सोडवायला धावलो, मात्र खूप उशिर झाला होता. आम्ही गोपाळला वाचवू शकलो नाही. मात्र त्याच्या आरोपींनी फाशी देण्यात यावी अशी आमची इच्छा आहे, असे शेजाऱ्यांनी सांगितले. (Older brother kills younger brother over clothes dispute in Kolkata)

इतर बातम्या

Nashik Crime | डॉ. सुवर्णा वाजेंनी पतींना रात्री तसा मेसेज का केला, त्यांच्यासोबत कोण होते, मृत्यूचे गूढ काय?

हॉटेलमधील CCTVने टिपले मृत्यूआधीचे हसरे चेहरे! सातही जणांनी हॉटेलात केक कापला, जेवण केलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.