पालघर साधू हत्याकांडप्रकरणी पुन्हा 24 जणांना अटक; 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी

पालघर साधू हत्याकांडप्रकरणी पुन्हा 24 जणांना अटक करण्यात आली असून त्यात 5 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. (Palghar lynching: 24 newly arrested accused sent to judicial custody)

पालघर साधू हत्याकांडप्रकरणी पुन्हा 24 जणांना अटक; 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 11:34 AM

ठाणे: पालघर साधू हत्याकांडप्रकरणी पुन्हा 24 जणांना अटक करण्यात आली असून त्यात 5 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यापैकी 19 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली असून इतर पाच आरोपींची भिवंडी येथील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. (Palghar lynching: 24 newly arrested accused sent to judicial custody)

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर आणि दरोडेखोर समजून जमावाने दोन साधूंसह त्यांच्या वाहनचालकांची हत्या केली होती. या हत्याप्रकरणी पोलिसांनी 248 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या पैकी 105 जणांची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी पुन्हा 24 जणांना अटक केली. त्यानंतर या सर्व आरोपींना डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी डहाणू न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एम. व्ही. जावळे यांनी आरोपींना ही शिक्षा सुनावली.

काय आहे प्रकरण?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती. (Palghar lynching: 24 newly arrested accused sent to judicial custody)

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत 101 जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. (Palghar lynching: 24 newly arrested accused sent to judicial custody)

संबंधित बातम्या:

पालघरमध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या अफवेतून तिघांची हत्या, 101 आरोपींना पोलीस कोठडी

Palghar Mob Lynching | नेमकं त्या दिवशी काय घडलं? गृहमंत्री थेट गडचिंचलेत, घटनास्थळी जाऊन आढावा 

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राम कदम यांचे जनआक्रोश आंदोलन, आंदोलनापूर्वी पोलिसांच्या ताब्यात

(Palghar lynching: 24 newly arrested accused sent to judicial custody)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.