शिवेसना पदाधिकाऱ्याचा कारनामा, स्वत:वर गोळीबार झाल्याचा रचला कट, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कार घेऊन जात असताना स्वत:वर गोळीबार झाल्याचा कट रचल्याप्रकरणी पालघर शहरातील शिवसेनेचे उपशाखा प्रमुख व बॅनर व्यवसायिक राजेश घुडे उर्फ बाळा यांना पोलिसांनी अटक केली.
पालघर : कार घेऊन जात असताना स्वत:वर गोळीबार झाल्याचा कट रचल्याप्रकरणी पालघर शहरातील शिवसेनेचे उपशाखा प्रमुख व बॅनर व्यवसायिक राजेश घुडे उर्फ बाळा यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना पालघर न्यायालयात हजर केले असता दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांनी स्वत:वर अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याचा कट रचला होता. या कटामध्ये आणखी लोकांचा सहभाग असल्याच शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कारमधून जात असताना गोळीबार केल्याचा बनाव
मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी राजेश घुडे यांच्यावर गोळीबार झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल तक्रारीप्रमाणे राजेश घुडे यांच्यासोबत ही घटना दांडेकर कॉलेज रस्ता परिसरात कार घेऊन जात असताना घडली होती. त्यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. मात्र गोळ्या राजेश घुडे यांना न लगता कारच्या काचांना लागल्या. त्यानंतर आरोपीने पळ काढला. हा सर्व घटनाक्रम तक्रारीत नमूद करण्यात आला होता.
गोळीबाराचा कट रचल्याचा आले समोर
दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी आपला तपास सुरु केला होता. मात्र अनेक महिने उलटल्यानंतरदेखील पोलीस तपासामध्ये आरोपीचा सुगावा लागत नव्हता. अखेर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवून पुरावे गोळा करायला सुरुवात केली. या चौकशीत घुडे यांनी स्वतःवरच गोळीबाराचा कट रचल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. सध्या त्यांना दहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
इतर बातम्या :