परमबीर सिंग नेमके गेले कुठे? विदेशात पळून गेले? ठाणे पोलीसांची लूक आऊट नोटीस जारी

. परमबीर सिंह आपल्या घरी दिसून आले नाहीत. तसंच केंद्र आणि राज्यांच्या तपास यंत्रणांकडून अनेक समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता ठाणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

परमबीर सिंग नेमके गेले कुठे? विदेशात पळून गेले? ठाणे पोलीसांची लूक आऊट नोटीस जारी
परमबीर सिंग
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 5:42 PM

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देश सोडून गेल्याच्या बातमी येत असताना आता त्यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या बातमीची पुष्टी खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केली आहे. परमबीर सिंह आपल्या घरी दिसून आले नाहीत. तसंच केंद्र आणि राज्यांच्या तपास यंत्रणांकडून अनेक समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आता ठाणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. (Thane police issues look-out notice against Parambir Singh)

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात एनआयएकडून परमबीर सिंग यांना अनेकदा समन्स बजावण्यात आलं आहे. पण आतापर्यंत एकही समन्स परमबीर सिंग यांना पोहोचलं नाही. त्यामुळे अटकेच्या भीतीने परमबीर सिंग परदेशात गेल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर परमबीर सिंग हे देशातील असल्याची शक्यता गृहविभागातील सूत्रांकडून मिळतेय.

ठाणे पोलिसांकडून लूक आऊट नोटीस

आता ठाणे पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सिंग हे आता विमानतळावरुन देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. दुसरीकडे सिंग यांचा रजेचा कालावधीही संपला आहे. पण रजेचा कालावधी वाढवण्यासाठीही त्यांनी अर्ज केलेला नाही. त्यामुळे परमबीर सिंग हे कुठे आहेत? असा सवाल आता विचारला जात आहे.

नाना पटोलेंचा केंद्रावर हल्लाबोल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह परदेशात फरार झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, परमवीर सिंह यांना त्याचवेळी ताब्यात घेतले असते तर अनेक गंभीर विषयांची माहिती मिळाली असती. आता ते परदेशात पळून गेले असावेत अशी तपास यंत्रणांना शंका असली तरी परमवीर सिंह यांना देशाबाहेर पाठवण्याची व्यवस्था केंद्र सरकार मार्फतच केली गेली आहे का? असा प्रश्न पटोले यांनी केलाय.

‘पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबाबतही बोलू शकतात’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला. नाना पटोले काहीही बोलतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला उत्तर द्यायची गरज नाही. ते तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष संदर्भातही बोलू शकतात, असं फडणवीस म्हणाले.

जयंत पाटलांचा सवाल

भुजबळसाहेबांना तुरुंगात डांबण्याचे काम भाजप सरकारने केले. परंतु कोर्टाने त्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपची यंत्रणा लागली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत, त्यांच्या आरोपावर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा, असा सवालही पाटील यांनी यावेळी केलाय.

इतर बातम्या :

जयंत पाटलांकडून फडणवीसांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पाठराखण! तज्ज्ञांच्या मतावर बोलणं टाळलं

‘मंत्री टीव्हीवर घोषणा करतात, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना खडकू मिळत नाही’, फडणवीसांचा घणाघात

Thane police issues look-out notice against Parambir Singh

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.