जामीन मिळाला नाही, पोलिसांना चकवा देऊन कोर्टातून 7 कैदी फरार, पोलीस विभागात खळबळ!

जामीन मिळाला नाही म्हणून कैद्यांनी चक्क कोर्टातून पोलिसांना चकवा देऊन धूम ठोकली. बिहारच्या दानापूरमध्ये ही घटना घडलीय. दानापूर न्यायालयात सुनावणीवेळी कैद्यांना आणलं असता कोर्टाने त्यांना जामीन नाकारला. त्यानंतर सात कैद्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन न्यायालयातून धूम ठोकली. (Patna Danpur not getting bail 7 prisoners Absconding court)

जामीन मिळाला नाही, पोलिसांना चकवा देऊन कोर्टातून 7 कैदी फरार, पोलीस विभागात खळबळ!
फोटो : प्रतिकात्मक
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 1:42 PM

पटना : जामीन मिळाला नाही म्हणून कैद्यांनी चक्क कोर्टातून पोलिसांना चकवा देऊन धूम ठोकली. बिहारच्या दानापूरमध्ये ही घटना घडलीय. दानापूर न्यायालयात (Danpur Court) सुनावणीवेळी कैद्यांना आणलं असता कोर्टाने त्यांना जामीन नाकारला. त्यानंतर सात कैद्यांनी पोलिसांना गुंगारा देऊन न्यायालयातून धूम ठोकली. यामुळे पाटना पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची दखत घेत कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांचं एक पथक फरार आरोपींना शोधण्यासाठी रवाना झालं आहे. (Patna Danpur not getting bail 7 prisoners Absconding court)

पोलिसांना चकवा देऊन कैदी पळाले

सिगोडी पोलीस स्टेशन परिसरातील नरौली गावात विजेच्या वादातून दोन गटांमध्ये मारहाण झाली पुढे प्रकरण एवढं वाढलं की मारहणीचं रुपांतर गोळीबार होण्यापर्यंत गेलं. याप्रकरणी जवळपास 12 ते 15 लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या संदर्भात पोलिसांनी कलम 72/21 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी  यातील 8 आरोपींनी सरेंडर केलं होतं.

यानंतर कोर्टाने जामीन अर्ज फेटाळताना त्या सर्व आरोपींना एकसोबतच कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. सर्व सरेंडर केलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यासाठी पोलिस कैद्यांच्या वाहनाकडे जात होते, त्यावेळी पोलिसांना चकवा देऊन सर्व 7 कैदी तिथून पळून गेले. जसंही कैदी पळाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं, ते पाहून पोलिसांची तर पाचावर धारण बसली.

लवकरात लवकर फरार आरोपींना शोधा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तसंच आरोपींचा छडा लावून त्यांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ही पहिलीच घटना नाही…!

दानापूर कोर्टातून येथून कैदी फरार झाल्याची ही पहिली घटना नाही, यापूर्वीही कोर्टाच्या आवारात गोळीबार, बॉम्बस्फोट आणि कैद्यांना पळवून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. याअगोदरही अनेकदा पोलिसांचा निष्काळजीपणा अनेक वेळा समोर आला आहेत.

(Patna Danpur not getting bail 7 prisoners Absconding court)

हे ही वाचा :

रेखा जरे- बाळ बोठेचा ‘प्रेमाचा अँगल’, पुढे बदनामीच्या भीतीने हत्या, मुख्य सूत्रधार बाळ बोठेवर अखेर दोषारोपपत्र दाखल!

पैसेवाल्यांचा माज, महामारीत हायफाय लग्नाचं रिसेप्शन, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न

पतीसाठी दरवाजा उघडा ठेवला, शेजारचा नराधम गुपचूप घरात शिरला, महिलेला मारहाण करत बलात्कार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.