दुग्धजन्य पदार्थांमधून विषबाधा; दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दुग्धजन्य पदार्थांमधून विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील वरवडे गावातील ही घटना आहे.

दुग्धजन्य पदार्थांमधून विषबाधा; दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 9:49 AM

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दुग्धजन्य पदार्थांमधून विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील वरवडे गावातील ही घटना आहे. भक्ती आबासाहेब चव्हाण वय सात व नम्रता आबासाहेब चव्हाण वय चार अशी मृत बहिणींची नावे आहेत. एकाच घरातील दोन सख्या बहिणींचा मृत्यू  झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

डेरीतून आणलेले पनीर, श्रीखंड खाल्ले

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील वरवडेमध्ये चव्हाण कुंटब राहाते. आबासाहेब चव्हाण यांना दोन मुली होत्या. या दोन्ही बहिणींनी दूध डेरीमधून आणलेले पनीर, श्रीखंड आणि बासुंदी खाल्ली होती. हे पदार्थ खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना त्रास होऊ लागला. त्रास वाढल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नमुने तपासणीसाठी रवाना

दरम्यान या प्रकरणाची अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या वतीने गंभीर दखल घेण्यात आली असून, अन्न भेसळ व प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आबासाहेब चव्हाण  यांच्या घराला भेट दिली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, संबंधित पदार्थांमध्ये भेसळ आहे की नाही हे तपासण्यासाठी ते ताब्यात घेण्यात आले आहे. अहवाला आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बातम्या

बहुचर्चीत पालममधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; फाटलेला नोटा आणि पेटीएममुळे आरोपीला अटक

मोफत जेवण दिलं नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण; अखेर ‘तो’ पोलीस अधिकारी निलंबित

NMC Scam | स्टेशनरी घोटाळा : साकोरे कुटुंबीयांना 40 वर्षांपासून कंत्राट; पाच नव्हे सात कंपन्या!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.