तब्बल 400 एटीएमचा डाटा चोरून लाखोंचा गंडा, पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या

एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे पिन क्रमांक चोरून पाहून त्यांना बोलण्यात गुंगवूत ठेवून हातचलाखीने डाटा चोरी करून खात्यावरील पैसे काढून गंडा घालणाऱ्या त्रिकुटाला डायगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तब्बल 400 एटीएमचा डाटा चोरून लाखोंचा गंडा, पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 5:55 PM

ठाणे : एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे पिन क्रमांक चोरून पाहून त्यांना बोलण्यात गुंगवूत ठेवून हातचलाखीने डाटा चोरी करून खात्यावरील पैसे काढून गंडा घालणाऱ्या त्रिकुटाला डायगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत तब्बल 414 डेबिट कार्डचा डेटा चोरून कोट्यावधी रुपयाचा गंडा घातल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अटक आरोपींना ठाणे न्यायालयाने 27 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकांना गंडा कसे घालायचे?

फिर्यादी वंदना विजय गोरी ह्या 10 जुलै 2019 रोजी बँक ऑफ बडोदा दहिसर या एटीएममध्ये दहा हजार रुपयांची रक्कम काढण्याकरता गेल्या होत्या. दरम्यान त्याच वेळी एटीएम मध्ये तीन अज्ञात इसमांनी शिरकाव केला. वृद्ध महिला वंदना गोरी यांचा नातू नीरज याला आरोपींनी बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच्याकडे असलेले एटीएम कार्ड हातचलाखीने काढून घेत, आरोपीने एटीएम कार्डचा डेटा चोरी केला. तब्बल 73 हजार २०० रुपये बनावट एटीएम कार्डद्वारे काढून या वृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आली. सदर प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डायघर पोलिसांना आरोपी शोधून जेरबंद करणे म्हणजे तारेवरची कसरत आणि एक आव्हानच होते.

तब्बल 400 एटीएम कार्डाचा डेटा चोरला

डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप सरफरे आणि त्यांचे तपास पथक यांनी सदर फसवणूक प्रकरणी गंभीरतेने तपास करीत तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलीस पथकाने तीन आरोपीना बेडया ठोकल्या. यात आरोपी जमिल अहमद मोहम्मद दरगाही शेख, गोविंद हनुमंत सिंग,आशिष कुमार उदयराज सिंग या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात नेले असता त्यांना 27 डिसेंबर, पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. पोलिस पथकांनी अटक आरोपींची कसून चौकशी केली. चोरलेला डेटा दुसऱ्या कार्डवर पेस्ट करत एटीएममधून पैसे काढण्याचा गोरख धंदा करीत असल्याचं समोर आले. दरम्यान या तिन्ही आरोपींनी आतापर्यंत जवळपास 400 डेबिट कार्डचा डेटा चोरून या त्याद्वारे बनावट एटीएम कार्ड बनवून कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.