Bhandara Crime | कुणाला कल्पना होती.. दुकानासमोर झोपलेला भिकारीच चोर? भंडाऱ्यात पोलखोल, तब्बल 28 दुकानं उचकटली!

रात्रीच्यादरम्यान पेट्रोलिंग करत असतांना भंडारा पोलिस पथकाला मोठ्या बाजारात एका दुकानाचे शटर उघडे दिसून आले. यामुळे नुकताच चोरी झाल्याचा संशय पोलिसांना आला. चोर आजुबाजुला असल्याचे लक्षात घेता पोलिसांनी अख्ख शहर पिंजुन काढले. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा बसस्थानक परिसरात आरोपी संतोष संशयितरित्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

Bhandara Crime | कुणाला कल्पना होती.. दुकानासमोर झोपलेला भिकारीच चोर? भंडाऱ्यात पोलखोल, तब्बल 28 दुकानं उचकटली!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 3:04 PM

भंडारा : भंडाऱ्यात भिकाऱ्याचे सोंग घेत दुकानासमोर झोपुन रात्री तेच दुकान फोडून चोरी (Theft) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना अखेर यश आले. संतोष सुरेश राजपूत वय 37 वर्ष राहणार प्रतापनगर नागपुर असे अटक (Arrested) करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. संतोष हा एक सराईत गुन्हेगार असून आतापर्यंत त्याच्यावर तब्बल 30 गुन्हे नोंद असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीयं. संतोषवर भंडारा जिल्ह्यात 8 तर नागपुर (Nagpur) जिल्हात 22 दुकान फोडी आणि घर फोडीची नोंद आहे. त्याच्याकडून घर फोडीचे साहित्य ही जप्त करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यात 8 तर नागपुर जिल्हात 22 दुकान फोडी

भंडारा शहरातील मोठ्या बाजार परिसरात अनेक दिवसांपासून दुकान फोडीच्या घटना सातत्याने घडत होत्या. सततच्या दुकान फोडीच्या घटनांमुळे पोलिसांवर दबाब वाढला होता. यामुळे दुकान फोडी करणाऱ्या चोरांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे होते. शहरातील दुकान फोडीमुळे पोलिसांवर टिका केली जात होती. यामुळे पोलिसांनी रात्रीची पेट्रोलिंग ही वाढवली होती. मात्र, असे असूनही दुकान फोडीच्या घटना घडतच होत्या.

हे सुद्धा वाचा

नुकताच चोरी झाल्याचा संशय पोलिसांना आला आणि भांडाफोड झाली

रात्रीच्यादरम्यान पेट्रोलिंग करत असतांना भंडारा पोलिस पथकाला मोठ्या बाजारात एका दुकानाचे शटर उघडे दिसून आले. यामुळे नुकताच चोरी झाल्याचा संशय पोलिसांना आला. चोर आजुबाजुला असल्याचे लक्षात घेता पोलिसांनी अख्ख शहर पिंजुन काढले. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास भंडारा बसस्थानक परिसरात आरोपी संतोष संशयितरित्या फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

आरोपीने 30 चोरीचे गुन्हे केल्याची दिली कबूली

संतोषला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चाैकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने भंडारा जिल्ह्यात 8 दुकान फोड्या तर नागपुर जिल्ह्यात 20 दुकानफोडी व 2 घर फोडी असे ऐकून 30 चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून घर फोडीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सराईत गुन्हेगाराच्या अटकेने अनेक गुन्हाची कबुली देखील मिळाली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.