कोल्हापूर पोलिसात खळबळ उडवणारी बातमी, कुंपनानेच शेत खाल्लं, धक्कादायक प्रकरण

कोल्हापुरात एका पोलीस कर्मचाऱ्याला चुकीचं काम करताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. कारागृहात गांजा नेताना चक्क कारागृह पोलीसच सापडला आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर पोलिसात खळबळ उडवणारी बातमी, कुंपनानेच शेत खाल्लं, धक्कादायक प्रकरण
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 9:04 PM

कोल्हापूर | 28 जुलै 2023 : पोलिसांना आपण देव मानतो. जगातील वाईट प्रवृत्तींना संपवण्याचं काम पोलीस करतात. पोलीस देशात अराजकतेवर मात मिळवण्याचा प्रयत्न करतात. ते गुन्हेगारांच्या मुसक्या आवळतात आणि त्यांना कारागृहात डांबतात. पोलीस आपलं रक्षण करतात. तसेच वाईट गोष्टींना आळा घालण्याचं काम करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात पोलिसांबद्दल मनापासून प्रचंड आदर असतो. पण काही पोलीस कर्मचारी पोलिसांची प्रतिमा मलिन करणारं कृत्य करतात. त्याचं काम शरमेने मान खाली घालवणारं असतं. कोल्हापूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कारागृहात गांजा नेताना चक्क कारागृह पोलीसच पकडला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण कोल्हापुरात चर्चा होऊ लागली आहे.

कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील हा संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहात गांजा नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाळासाहेब गेंड याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून गांजाची पुडी कारागृहात नेण्याचा प्रयत्न बाळासाहेब गेंड करत होता. पण त्याचं हे कृत्य उघड झालं आहे.

पोलिसाच्या घरीही सापडला गांजा

पोलिसांनी बाळासाहेब गेंडला अटक केली. त्याची कसून चौकशी केली. तसेच त्याच्या घराची देखील झाडाझडती घेतली. याशिवाय तो जिथे कारागृहात पोस्टिंगला असतो तिथली झाडाझडती घेण्यात आली. या दरम्यान, बाळासाहेब गेंड याच्या घरी आणखी गांजा सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

गेल्या काही दिवसापासून कळंबा मध्यवर्ती कारागृहात वारंवार गांजा सापडत होता. बाळासाहेब गेंडकडून कोणासाठी गांजा नेला जात होता? याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान, कारागृहातील पोलीसच कैद्यांना गांजा पुरवत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

कुंपनच शेत खातंय?

एकीकडे पोलीस गुन्हेगारांना अटक करुन तुरुंगात डांबत आहेत. त्यांना योग्य ती शिक्षा दिली जात आहे. असं असताना तुरुंगात असलेल्या कैद्यांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच गांजा पुरवला जाणे म्हणजे कुंपनच शेत खात असल्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे आरोपी बाळासाहेब गेंड हा एकटा या प्रकरणात दोषी आहे की त्याच्यासोबत आणखी कुणी सामील आहे? याची माहिती आता तपासातून समोर येईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.