मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने या प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. (pooja chavan suicide case: viral audio clips raises many questions)

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 7:03 PM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याने या प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याच्या संभाषणाची ही क्लिप आहे. एका क्लिपमध्ये तर हा मंत्री मलाच जीव द्यावा लागेल असं म्हणताना दिसत आहे. त्यामुळे पूजाच्या आधीच या मंत्र्याला जीव द्यावासा का वाटलं? याबाबतचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (pooja chavan suicide case: viral audio clips raises many questions)

पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्याने तिच्या आत्महत्येबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पूजाच्या आत्महत्येमागे काही काळंबेरं आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यातच एका मंत्र्यांचं आणि त्याच्या कार्यकर्त्याचं कथित संभाषण व्हायरल झाल्याने त्यावर अधिकच तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या क्लिप्समध्ये पूजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, तिची कसली तरी ट्रीटमेंट सुरू होती आणि या मंत्र्यांचं या संपूर्ण प्रकरणाशी कसलं तरी कनेक्शन होतं, असं स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीची मागणी होत आहे.

मंत्री नेमकं काय म्हणाले? 

कथित मंत्री आणि त्याच्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याची ही 12 मिनिटाची क्लिप आहे. या क्लिपमध्ये मंत्री वैतागलेले दिसत आहेत. टेन्शनमध्ये असल्याचं ते सांगत आहेत. मंत्री: मला एक तर टेन्शन… टेन्शन आलंय. आधीच मी परेशान आहे. घराचं टेन्शन आहे. समजव तिला. तूच तिला कन्व्हिन्स करू शकतो. अरुण: काही तरी मार्ग काढावा लागेल. मंत्री: कन्व्हिन्स कर तू. अरुण: कन्व्हिनस करावं लागेल, अवघड विषय आहे,. मागे लागेल… मी जातो आणि व्यवस्थित बोलतो. मंत्री: ठिक आहे. तू कर नंतर मी येतो. त्यानंतर या दोघांमध्ये मुलीच्या ट्रिटमेंटबाबत चर्चा सुरू होते. त्यावर अरुण ही मुलगी सर्किट असल्याचं सांगतो. मग मंत्री तिला गोडीत समजावण्याचं अरुणला सल्ला देतात. त्यावर हा बदनामीचा धंदाच आहे, असं अरुण म्हणतो. अरुणच्या या उत्तराने मंत्री अधिकच वैतागतात. माझ्या घरी काय चालू आहे माझं मलाच माहीत. घर डिस्टर्ब झालंय माझं. मला माहीत मी किती परेशान आहे. तिला समजाव तू, असं हा मंत्री म्हणतो. त्यावर तुमचं रेप्युटेशन आहे. हे तिला कळलं पाहिजे, असं अरुण म्हणतो. मंत्री: मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे. अरुण: तुम्ही काही करणार नाही. मी बघतो परिस्थिती हाताळतो. मंत्री: तूच काही तरी कर, मी काही करत नाही. अरुण: मी करतो कन्व्हिन्स

दुसऱ्या संभाषणात काय म्हणाले?

अरुण: तिने किट आणली आणली आणि टेस्ट केली. रेड पट्टी झाली. पॉझिटीव्ह आली. एकदमच धडधड झाली. काय करू आणि काय नको असं झालं. घामच फुटला. रुममध्ये आल्यावर कालच माझं आधार कार्ड घेतलं होतं. तिला समजून सांगणं गरजेचं आहे. नाही तर ती भलतीच माथेफिरू… सायको आहे. तिला एकदम कन्व्हिन्स केलं पाहिजे.

मंत्री: हे सगळं झालं की इतक्या लांब जाईल की मला स्वप्नातही दिसलं नाही. म्हटलं तुझं स्वप्नं कर पूर्ण. पण ती दुसऱ्याच मार्गावर गेली. त्यात माझी थोडीच चूक आहे. माझी प्रतिमा… माझी इज्जत…हां… माझ्यामागे एवढा समाज आहे.

अरुण: लोकांना काय विषय चघळायला पाहिजे

मंत्री: मला तर काही कळतच नाही. मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.

अरुण: तुम्हाला काही होणार नाही. टेन्शन घेऊ नका. मी करेल सर्व बरोबर. मी समजावतो ना नंतर.

मंत्री: तू आधी सगळं सांभाळ. मी येतो नंतर…

अरुण: ठिक आहे.

मंत्र्याच्या कुटुंबीयांनाही माहिती होती?

या संभाषणावरून पूजाआधीच या मंत्र्याला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचं दिसून येत आहे. पूजाच्या टेन्शनमुळे मंत्र्याला आत्महत्या करावीशी का वाटली? या प्रकरणाशी मंत्र्याचा नेमका संबंध काय? हे प्रकरण मंत्र्यांच्या अंगलट तर येत नव्हतं ना? असा सवाल काही जाणकार व्यक्त करत आहेत. तसेच या मंत्र्याच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाची माहिती होती का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. घर डिस्टर्ब झालं असं मंत्री या संभाषणावेळी म्हणतात, याचा अर्थ काय होतो? हे सांगायला नको, असं राजकीय निरीक्षक सांगतात. (pooja chavan suicide case: viral audio clips raises many questions)

विशेष टीप: हा सर्व व्हायरल क्लिप्सचा मजकूर आहे. टीव्ही 9 मराठी आणि टीव्ही 9 वेब याची पृष्टी करत नाही.

संबंधित बातम्या:

परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

पूजा चव्हाणला नेमकं काय झालं होतं? ती स्ट्रीप रेड का झाली?; कथित मंत्री का घाबरला?

(pooja chavan suicide case: viral audio clips raises many questions)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.