धक्कादायक : पुण्यात 11 वर्षीय मुलीवर बाप, भाऊ, आजोबा आणि चुलत मामाकडूनच लैंगिक अत्याचार!

पुण्यात एका 11 वर्षीय मुलीवर बाप, भाऊ, आजोबा आणि चुलत मामाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ताडीवाला रोड येथे ही मुलगी राहते. महत्वाची बाब म्हणजे मागील चार वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याचं समोर आलंय.

धक्कादायक : पुण्यात 11 वर्षीय मुलीवर बाप, भाऊ, आजोबा आणि चुलत मामाकडूनच लैंगिक अत्याचार!
उल्हासनगरात खिळे असलेल्या दांडक्याने तरुणाला मारहाणImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 9:58 PM

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिचा बाप, भाऊ, मामा आणि आजोबाने लैंगिक अत्याचार (Sexually Abused) केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीने तिच्या शाळेत आयोजित ‘गुड टच, बॅड टच‘ (Good Touch Bad Touch) या सत्रात या धक्कादायक अत्याचाराबाबत सांगितले. पीडित मुलीने तिच्या समुपदेशकांजवळ सर्व प्रकार सांगितला. नंतर समुपदेशकांच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय मूळचे बिहारचे रहिवासी असून ते सध्या पुण्यात वास्तव्याला आहेत. (An 11-year-old girl was sexually abused by her father and brother in Pune)

पीडितेवर मागील पाच वर्षे बलात्कार, विनयभंग

पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या किशोरवयीन भावाने आणि बापाने वेगवेगळ्या वेळी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर मुलीचे आजोबा आणि मामाने तिचा विनयभंग केला, अशी माहिती पुणे पोलिसांनी शनिवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत हे गुन्हे घडले आहेत. संबंधित आरोपींविरुद्ध बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित मुलीला बिहारमध्ये राहत असताना सन 2017 पासून लैंगिक अत्याचार सहन करावा लागल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

वेगवेगळ्या वेळी घटना घडल्याने सामूहिक बलात्काराचा गुन्हा नाही

पीडित मुलीने तिच्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘गुड टच आणि बॅड टच’ सत्रादरम्यान स्वतःवरील लैंगिक अत्याचाराबाबत तोंड उघडले, असे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते यांनी सांगितले. तक्रारीचा संदर्भ देत अधिक माहिती देताना सातपुते यांनी सांगितले की, 2017 मध्ये पीडित मुलीच्या बापाने तिचा लैंगिक छळ सुरू केला होता. त्यानंतर मुलीच्या मोठ्या भावाने नोव्हेंबर 2020 च्या सुमारास तिचा लैंगिक छळ सुरू केला. तसेच मुलीच्या आजोबा आणि मामाने तिला अयोग्यरित्या स्पर्श करून विनयभंग केला. सर्व घटना वेगवेगळ्या वेळी घडल्या. तसेच आरोपींना एकमेकांच्या गैरकृत्यांची माहिती नसल्याने हे सामूहिक बलात्काराचे प्रकरण नाही. या प्रकरणात पॉक्सो कायद्याची कलमेदेखील जोडली जातील, असे पोलीस निरीक्षक सातपुते यांनी स्पष्ट केले.

पीडितेचे मुलीचे आईवडील मूकबधिर आहेत. पीडित मुलगी पुण्यातील एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेते. पुण्याव्यतिरिक्त बिहारमधील तिच्या मूळ गावीही मुलीचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे पोलिसांची एक टीम लवकरच बिहारमध्येही जाऊन अधिक तपास करणार आहे. (An 11-year-old girl was sexually abused by her father and brother in Pune)

इतर बातम्या

Kalyan Fraud : मनसे शहराध्यक्षांवर चार कोटी 11 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा

Yavatmal Murder : डिजेवरचा ठेका जीवावर बेतला, यवतमाळमध्ये तरुणाची हत्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.