मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायला गेला, मात्र घरी परतलाच नाही; तरुणासोबत नेमके काय घडले?

प्रणव इंद्रायणी महाविद्यालयात एफवायबीकॉमचे शिक्षण घेत होता. याप्रकरणी तळेगाव पोलिसात हत्येचा गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

मित्रांसोबत वाढदिवस साजरा करायला गेला, मात्र घरी परतलाच नाही; तरुणासोबत नेमके काय घडले?
एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 07, 2022 | 5:43 PM

पुणे : एका महाविद्यालयीन तरुणावर हल्ला करत त्याची हत्या केल्याची घटना पुण्याच्या तळेगावमध्ये उघडकीस आली आहे. प्रणव उर्फ जय मांडेकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रणव इंद्रायणी महाविद्यालयात एफवायबीकॉमचे शिक्षण घेत होता. याप्रकरणी तळेगाव पोलिसात हत्येचा गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

मित्राचा वाढदिवस साजर करण्यासाठी चालला होता

पुण्याच्या तळेगावमध्ये महाविद्यालयीन शिकणारा प्रणव मांडेकर हा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला होता. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या विशाल वर्माची मंगेश हिरे नामक तरुणाशी फोनवर बाचाबाची सुरु होती.

दुसऱ्याच्या वादात तरुणाचा बळी

यानंतर या तरुणाला मारण्यासाठी 20 ते 25 जणांचे टोळके त्या ठिकाणी आले. या टोळक्याने प्रणवला त्या तरुणाचा साथीदार समजून त्याची हत्या केली. दुसऱ्याच्या वादात निष्पाप प्रणवचा हकनाक बळी गेल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमके प्रकरण काय?

मयत प्रणव हा विशाल वर्मासह वाढदिवसाला गेला होता. वर्मा आणि मंगेश हिरेचे फोनवर वाद झाला होता. याचा राग मनात धरून त्याने विशाल वर्माला धडा शिकवण्यासाठी 20 ते 25 जणांचे टोळके घेऊन गेला.

विशाल वर्मासोबत प्रणवसह एकूण 9 जण होते. सर्व वाढदिवस साजरा करुन घरी परतत होते. यावेळी मंगेश साथीदारांसह तेथे आला. टोळक्याला पाहून सर्व मित्र पळू लागले. पळता पळता प्रणवला ठेच लागून तो पडला आणि नेमका आरोपींच्या तावडीत सापडला.

टोळक्याने त्याला विशालचा साथीदार समजून त्याच्यावर हल्ला करत त्याला ठार मारले. यावेळी प्रणवचे अन्य मित्र पळून जाण्यात यशस्वी झाले. तसेच ज्याला मारायला टोळके आले होते, तो विशाल वर्माही सुखरुप वाचला आहे.

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.