भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीकडून पत्नीचा चाकू खूपसून खून

भावासोबत अनैतिक संबंध (Affair) असल्याच्या संशयावरून पतीने पोटात चाकू खूपसून पत्नीचा खून केल्याची घटना पुण्यात (Pune) घडली आहे. पुण्यातल्या वाघोली (Wagholi) इथल्या मॅजेस्टिक सोसायटीच्या लेबर कॅम्पमध्ये ही घटना समोर आली.

भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पतीकडून पत्नीचा चाकू खूपसून खून
प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 5:56 PM

पुणे : भावासोबत अनैतिक संबंध (Affair) असल्याच्या संशयावरून पतीने पोटात चाकू खूपसून पत्नीचा खून केल्याची घटना पुण्यात (Pune) घडली आहे. पुण्यातल्या वाघोली (Wagholi) इथल्या मॅजेस्टिक सोसायटीच्या लेबर कॅम्पमध्ये ही घटना समोर आली. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. भल्या पहाटे ही घटना घडल्याने लेबर कॅम्पमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. (A husband has stabbed his wife to death in Pune on suspicion of having an affair)

अनु राजू मिर्झा (वय 28) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे तर याप्रकरणी पती राजू पुनाराम मिर्झा (वय 30) याला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी राजेश मिर्झा यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कुटुंब मूळचे छत्तीसगढचं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झा कुटुंब मूळचे छत्तीसगढ इथलं आहे. आरोपी राजू मिर्झा, मृत अनू मिर्झा हे दोघं मोशी इथं बांधकामावर मजूर म्हणून काम करत होते. त्यांना दोन मुलं आहेत. राजू हा दारू पिऊन अनुला सतत मारहाण करत असल्याने त्यांच्यात भांडणं होत असायची. दोन-तीन महिन्यांपू्र्वी अनू गावाला जाते असं म्हणत घर सोडून गेली. पण ती गावी न जाता राजूचा धाकटा भाऊ राजेश मिर्झा याच्याकडे वाघोली इथं रहायला आली.

भावासोबत संबंध असल्याच्या संशयातून खून

याबाबत राजूला माहिती मिळाली असता तो सोमवारी पहाटे वाघोली इथल्या लेबर कॅम्पमध्ये अनुला भेटायला आला. अनु पत्र्याच्या खोलीत झोपली होती. राजुने मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणत अनुला घराबाहेर बोलावलं. तिच्याशी वाद घातला. तु सारखी माझ्या भावासोबत बोलतेस, त्याच्यासोबतच राहतेस, असा संशय मनात घेऊन त्याने प्लास्टिकच्या पिशवीत आणलेल्या चाकूने पोटात सपासप वार करून अनुचा खून केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला.

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि प्रियकराने काढला काटा, दोन महिन्यानंतर असा झाला खुनाचा उलगडा

आधी इन्स्टाग्रामवर ओळख, मग शारीरिक संबंध; हनी ट्रॅप करून व्यावसायिकाला लुटणारी टोळी पुण्यात जेरबंद

पुण्यात निवृत्त एअरफोर्स अधिकारी ‘हॅनी ट्रॅप’च्या जाळ्यात, 50 लाखांची खंडणी मागितली, पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.