AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नर्सचा ड्रेस घालून आली आणि 3 महिन्याच्या मुलीला घेऊन पळून गेली, ससून रुग्णालयातला धक्कादायक प्रकार

पुण्यातील प्रसिद्ध ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने वॉर्डातून पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  22 वर्षीय महिला आणि तिची तीन महिन्याची मुलगी अनेक दिवसापासून ससून रुग्णालयात उपचार होते घेत होते.

नर्सचा ड्रेस घालून आली आणि 3 महिन्याच्या मुलीला घेऊन पळून गेली, ससून रुग्णालयातला धक्कादायक प्रकार
ससून हॉस्पिटल, पुणे
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 12:52 PM
Share

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने वॉर्डातून पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  22 वर्षीय महिला आणि तिची तीन महिन्याची मुलगी अनेक दिवसापासून ससून रुग्णालयात उपचार होते घेत होते.

नर्सच्या वेषात येऊन बाळाळा पळवलं

सव्वीस वर्षीय महिला आणि तिच्या पतीने तीन महिन्याच्या मुलीला पळविल्याने रुग्णालयात एखच खळबळ निर्माण झाली आहे. सविस्तर माहिती अशी की, नर्सचा ड्रेस घालून 26 वर्षीय महिला ससून रुग्णालयात शिरली. संधी साधत तिने वॉर्डात प्रवेश मिळवला. अन् बाळाच्या आईचं दुर्लक्ष होताच तिने डाव साधला. काही मिनिटांत तिने बाळाला घेऊन तिथून पोबारा केला.

आपलं बाळ आपल्या शेजारी होतं आणि आता नाहीय या कल्पनेने बाळाच्या आईने हंबरडा फोडला.  आईच्या हंबरड्याने वॉर्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांना देखील गलबलून आलं. यावेळी रुग्णालयात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.

आरोपी पती पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे ससूनमधील तीन महिन्याचं बाळ पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळविल्याने ससूनची सुरक्षा यंत्रणा एवढी गहाळ कशी असू शकते, असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.

काही तासांत आरोपींना बेड्या

ससून रुग्णालय प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनीही वेगाने सूत्रे फिरवित अगदी काही तासांतच आरोपी महिला आणि पुरुषाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून बाळाची सुखरुप सुटका केली असून पोलिसा पुढील चौकशी करत आहेत.

आरोपी पती पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे बाळ पळवलं

आरोपी पती पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे त्यांनी ससूनमध्ये येऊन बाळ पळविण्याचं धाडस केलं. एरव्ही ससूनमधील सुरक्षा यंत्रणा अतिशय सतर्क असते. मग या प्रसंगात सुरक्षा यंत्रणा कशामुळे गहाळ राहिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत.

(Accussed Came Dressed nurse Took 3 month old Daughter Sasson Hospital)

हे ही वाचा :

नाशिकमध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत घातला २१ लाखांचा गंडा

भाजपच्या माजी मंत्र्याची टॉवेलने गळा आवळून हत्या, राहत्या घरात मृतदेह सापडला

तीन वेळा लग्न केलं, तीनही वेळा संसार मोडून माहेरी परतली, पित्याने घरात घेण्यास विरोध करताच जन्मदात्याची हत्या, बुलडाणा हादरलं

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.