Pune crime | पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; चाकण पोलीस स्थानकात ८५ हजारांची लाच घेताना एकाला रंगेहात पकडले

चाकण पोलीस स्थानकात तक्रार आली होती. मात्र तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी 70 हजारांची लाच मागितली होती. यानंतर आरोपी शेख याने उपनिरीक्षक यांच्यासाठी 70  हजार तर स्वत:साठी 15  हजार रुपये, असे एकूण 85  हजार रुपयांची लाच तक्रारदार तरुणाकडे मागितली

Pune crime |  पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; चाकण पोलीस स्थानकात ८५ हजारांची लाच घेताना एकाला रंगेहात पकडले
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 5:22 PM

पुणे – शहरातील चाकण पोलीस ठाण्यात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकत 85 हजारांची लाच घेताना एकाला रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने पिंपरी- चिंचवड पोलीस दलात यामुळे खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसात आलेली तक्रार न स्वीकारण्यासाठी ही लाच देण्यात येत होती. अशी माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे. अखत्तर शेखावत अली शेख (वय 35), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अशी केली कारवाई

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 27  वर्षीय तरुणाने याबाबत तक्रार दिली होते.   चाकण पोलीस स्थानकात तक्रार आली होती. मात्र तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी 70 हजारांची लाच मागितली होती. यानंतर आरोपी शेख याने उपनिरीक्षक यांच्यासाठी 70  हजार तर स्वत:साठी 15  हजार रुपये, असे एकूण 85  हजार रुपयांची लाच तक्रारदार तरुणाकडे मागितली. याबाबत तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.तरुणाच्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून आरोपी शेख याला 85  हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक क्रांती पवार तपास करीत आहेत.

IND VS SA: सेंच्युरियनवरील विजयानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया म्हणाला….

Satara Crime : साताऱ्यात दुसरीत शिकणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार करुन खून, काही तासांत आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Change in crop pattern : मराठवाड्यातही ऊस गाळपात अन् लागवड क्षेत्रातही होतेय वाढ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.