BREAKING | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ज्या माजी नगरसेवकावर हा हल्ला झालाय या माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चांगला दबदबा आहे.

BREAKING | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 9:17 PM

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्याव जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात आरोपींनी कोयता आणि कुऱ्हाडीने मेहबूब यांच्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात मेहबूब पानसरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारांसाठी पुणे येथे हलविण्यात आलं आहे.

मेहबूब पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मेहबूब यांच्यावर जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहेच. संबंधित हल्ल्याची घटना ही शुक्रवारी (7 जुलै) संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मेहबूब पानसरे हे खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात.

हे सुद्धा वाचा

मेहबूब यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. मेहबूब यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना कार्यकर्ते आणि त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या घटनेवर जेजुरीत निषेध व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासोबत इतकं भयानक कृत्य कसं होऊ शकतं? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.