Sharad mohol murder | वकिलांना आधीच होती शरद मोहळ याच्या खुनाची माहिती
Sharad mohol murder case | शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघांना खुनाची माहिती आधीच होती, असा दावा पोलिसांनी केला आहे.
योगेश बोरसे, पुणे, दि. 11 जानेवारी 2024 | पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहळ याच्या खुनासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही वकिलांना खुनाची आधीच माहिती होती, असा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात ही माहिती दिली. पोलिसांनी शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
खूनासाठी शस्त्रे अशी मिळवली
शरद मोहोळ याचा खून करण्यासाठी आरोपी धनंजय वटकर आणि सतीश शेडगे यांनी शस्त्रे मागवली. ही शस्त्रे त्यांनी मध्यप्रदेशमधून मागविली होती. त्यांना शस्त्रे देणाऱ्या शोध पुणे पोलीस घेत आहेत. आरोपींनी एकूण चार शस्त्रे मागवली असून त्यातील तीन शस्त्र जप्त केली आहेत. याशिवाय आणखी काही शस्त्रे त्यांना पुरविली का? याचाही शोध पोलीस घेत असल्याचे सुनील तांबे यांनी सांगितले.
आणखी आरोपींना अटक होणार
शरद मोहोळ खून प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. आरोपींनी जुने सिमकार्ड काढून नवीन सिमकार्डवरून एका व्यक्तीला फोन केला होता. या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलीसांना आहे. ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांनी मुंबर्इतील पोलिस अधिकारी हर्षल कदम यांच्याबरोबर संभाषण केले होते. कदम यांनी त्यांना जवळच्या कोणत्याही पोलिस ठाण्यात हजर होण्याचे सांगितले. परंतु ते दिशेला का गेले? असा प्रश्न न्यायालयात सरकारी पक्षातर्फे उपस्थित करण्यात आला.
शरद मोहोळ याचा खून करण्याचा मुन्ना मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानुगडे यांचा अनेक दिवसांपासून प्रयत्न होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी झाला. त्यानंतर सतत आरोपी संधीच्या शोधात होते. अखेर पाच जानेवारी रोजी त्यांनी शरद मोहोळ याची हत्या केली.