Video | आधी सोबत जेवले, नंतर बाहेर पडताच शरद मोहोळच्या छाताडावर गोळ्या घातल्या; सीसीटीव्हीतील थरार समोर

Sharad mohol murder case | पुणे शहरात गँगवारमधून शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी हत्या झाली. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी शरद मोहोळ याची हत्या झाली. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघांनी गोळीबार केल्याचे दिसत आहे.

Video | आधी सोबत जेवले, नंतर बाहेर पडताच शरद मोहोळच्या छाताडावर गोळ्या घातल्या; सीसीटीव्हीतील थरार समोर
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 1:36 PM

योगेश बोरसे, पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | पुणे शहरात शुक्रवारी भरदिवसा गोळीबार झाला. चार हल्लेखोरांनी गुंड शरद मोहोळ याची भरदुपारी हत्या केली. या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ माजली. शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून त्याचा सहकारी साहिल पोळेकर याचे नाव समोर आले आहे. हत्या करण्यापूर्वी शरद मोहोळ याच्यासोबत त्याच्या साथीदारांनी जेवण केले. त्यानंतर सर्व जण घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडताच त्यांनी शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या सीसीटीव्हीमध्ये अगदी जवळूनच शरद मोहोळ याच्यावर हल्ला केल्याचे दिसत आहेत.आरोपींना एकूण चार गोळ्या झाडल्याचे दिसत आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी या ठिकाणावर पळ काढला. घरासमोर घडलेला हा प्रकार घरच्या मंडळींनी पाहिला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या शरद मोहोळ याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना मोहोळ याचे निधन झाले.

गोळ्या झाडून पळ काढला

शरद मोहोळ याच्यावरील हल्लाचे फुटेज शनिवारी समोर आले. पोलिसांना शुक्रवारीच हे फुटेज मिळाले होते. या फुटेजमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शरद मोहोळ याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनी गोळीबार केल्याचे दिसत आहे. या लोकांनी शरद मोहोळ यांच्यावर गोळ्या झाडून घटनास्थळावरुन पळ काढला. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन हल्लेखोर दिसत आहे. आर्थिक व्यवहारातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

दोन वकील असल्याचा दावा

शरद मोहोळ याच्या हल्ला प्रकरणात दोन वकिलांचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. रवींद्र पवार आणि संजय उड्डाण अशी त्यांची नावे आहेत. दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात प्रँक्टीस करतात. पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही इतर आरोपींसोबत रात्री अटक केली. यामुळे या प्रकरणास नाटयमय वळण मिळाले आहे. दरम्यान या प्रकरणात आठ आरोपींना अटक केली आहे. त्या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस आरोपींची कोठडी मागणार आहेत.

हे आहेत आठ आरोपी

  1. साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर(वय २०, रा. सुतारदरा, कोथरुड)
  2. विठ्ठल किसन गडले (वय ३४, रा. सुतारदरा, कोथरुड)
  3. अमित मारुती कानगुडे (वय २४, रा. धायरी)
  4. नामदेव महिपत कानगुडे (३५, रा. भूगाव)
  5. चंद्रकांत शाहु शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती),
  6. विनायक संतोष घवाळकर (वय २०, रा. कोथरुड),
  7. रवींद्र वसंतराव पवार (वय ४०)
  8. संजय रामभाऊ उउ्डाण (वय ४५, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड)

हे ही वाचा

दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? लग्नाच्या वाढदिवशी शरद मोहोळचे पत्नीसाठी स्टेट्स

माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?
फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला सलमानशी लग्न करायचंय?.
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्...
सिनेट निकाल जाहीर, वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया,5 उमेदवार विजयी अन्....
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेन उघडल खातं.
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा
कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा.
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?
लाडक्या बहिणीचा राग अनावर, कार्यालयाच्या तोडफोडीवर काय म्हणाले फडणवीस?.
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका
जसं काय राऊतांने सगळ्यांचे कपडे काढण्याचा अधिकार.., भाजप नेत्याची टीका.
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?
अक्षयच्या दफनविधीला विरोध, मृतदेहाचं काय होणार? कोर्टाचे आदेश काय?.
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका
दिघेंचं नाव घेण्याची लायकी या विषारी सापात...भाजप नेत्याची टीका.
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'....
फडणवीस धर्मवीर 3 ची पटकथा लिहीणार? राऊत म्हणताय, त्यांनी 'गोलमाल'.....