Pune Crime |अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नीच्या विरोधात ईडीकडे तक्रार ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन बळकावली

सातबाऱ्यावर फेरफार करतांना महसूल विभागाने त्याच्या नोटिसा दाभाडे कुटुंबियांना दिल्या नाहीत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून, राजकीय लागेबांधे वापरत पूनम शत्रुघ्न सिन्हा ,कुश सिन्हा व त्यांचे साथीदार यांनी जमीन स्वतःच्या नावे करून घेतली .

Pune Crime |अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नीच्या विरोधात ईडीकडे तक्रार ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन बळकावली
Poonam Shatrughan Sinha
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 4:28 PM

पुणे – हवेली तालुक्यातील वाघोली येथे मृत व्यक्तीला जिवंत दाखवत1  हेक्टर क्षेत्र बळकावल्या प्रकरणी प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा, पुत्र कुश सिन्हा यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत जमीन मालक संदीप दाभाड़े यांनी याबाबत ईमेल द्वारे बंडगार्डन पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ही तक्रार केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

फिर्यादी संदीप दाभाडे यांची वडिलोपार्जित जमीनीचे कुलमुखत्यार पत्र त्यांचे पिता गोरखनाथ दाभाडे यांनी पूनम शत्रुघ्न सिन्हा ,कुश सिन्हा यांना 2002 ,2004 मध्ये दिले होते. गोरख दाभाडे सन 2007  साली मृत झाल्यावर ते कुलमुखत्यार पत्र कायदेशीररित्या गैरलागू ठरत होते. संदीप दाभाडे आणि त्यांच्या भाऊ बहिण हे वडिलोपार्जित संपत्तीचे आधीच मालक होते. वडीलांच्या मृत्यूनंतर त्याचा वारस हक्क सुद्धा मिळत होता.मात्र वडिलोपार्जित संपत्तीचे संदीप दाभाडे व भाऊ बहिण हे मालक असतांनाही त्यांची परवानगी न घेता व गोरखनाथ दाभाडे मृत झाल्यानंतरदेखील ते जिवंत असल्याचे घोषणापत्र आणि प्रतिज्ञापत्र सन 2009 , 2010मध्ये तयार करून देऊन व त्याचा उपयोग करून घेत पूनम शत्रुघ्न सिन्हा ,कुश सिन्हा यांनी जमिनीचे विक्रीपत्र नोंदवले. दुय्यम निबंधक हवेली- 11 या कार्यालयात हे विक्रीपत्रे नोंदविताना गोरखनाथ दाभाडे हे मृत झाले आहेत हे लपवून ठेवण्यत आले. तसेच ते जिवंत असल्याचा जबाब देत पूनम शत्रुघ्न सिन्हा व इतर स्वाक्षऱ्या सुद्धा केल्या.

जमीन मर्सिडीज कंपनीला भाडेकरारावर दिली

सातबाऱ्यावर फेरफार करतांना महसूल विभागाने त्याच्या नोटिसा दाभाडे कुटुंबियांना दिल्या नाहीत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून, राजकीय लागेबांधे वापरत पूनम शत्रुघ्न सिन्हा ,कुश सिन्हा व त्यांचे साथीदार यांनी जमीन स्वतःच्या नावे करून घेतली . या जमिनीतील 60, 000 हजार चौरस फूट जमीन सन 200-2004 पासून त्यांनी ती दाभाडे कुटुंबीय यांचे नावावर असतांना त्यांनी गैरकायदेशीरपणे शेतीची जमीन मर्सिडिस कंपनीला शो रूम साठी भाडे कराराने देऊन त्याचे सिन्हा कुटुंबीय घेत भाडे घेत आहेत .

शेती अकृषिक उपयोगात असतानाही तिला शेती दाखवून सन 2009  मध्ये गोरखनाथ दाभाडे हे मृत झाले असतानाही त्याचे नावाने अर्ज करून उप विभागीय अधिकारी पुणे यांचे कार्यालायातून शेती खरेदीची परवानगीबेकायदेशीर रित्या मिळविली . याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रारी देऊन उपयोग झाला नाही ,असे संदीप दाभाडे यांनी सांगितले.

पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र तक्रारीतील मोठी नावे पाहून तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिला. दाभाडे यांनी पोलीस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून ही माहिती दिल्यावरही हालचाल झाली नाही. अखेर दाभाडे यांनी सोमवारी सकाळी सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त परीमंडळ क्र. 2 यांना भेटून तक्रार दिली. याप्रकरणी ईडीकडे देखील तक्रार केल्याची माहिती संदीप दाभाडे यांनी पत्रकाद्वारे दिली.

Nagpur Cool | बाप्पाला भरली हुडहुडी!, शॉल, टोपरे घातले; गाभाऱ्यात का करण्यात आली हिटरची व्यवस्था?

Special News| बळीच्या राज्यात मजुरांचा ‘बळी’, गावाबाहेर गेल्यास बहिष्कृत करणार; नाशिकमधल्या तळवाडे ग्रामपंचायतीचा अजब फतवा

UPSC विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक; सर्व श्रेणींच्या रेल्वे तिकिटावरील सवलती एका क्लिकवर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.