पुण्यातील दादागिरी, गुंडगिरी संपणार, पोलीस आयुक्तांनी घेतला सर्वात मोठा निर्णय
Pune Crime News : नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील नामचीन गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे.
प्रदीप कापसे, पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली होती. नुकतेच मोहळ आणि मारणे गँगमधील वादामुळे शरद मोहळ याची हत्या झाली. पुणे शहरात कोयता गँगचाही उपद्रव सुरु असतो. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे विरोधकांनी पोलिसांवर आणि सत्ताधाऱ्यांवर सातत्याने हल्ले चालवले आहेत. यामुळे राज्य शासनाने पुण्याची जबाबदारी अमितेश कुमार यांच्याकडे दिली. पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पुणे शहरात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट
पुण्यात आयुक्त अमितेश कुमार यांनी क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील नामचीन गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे कुख्यात गुंड, रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सलग २ दिवस सुरू असलेल्या गुन्हेगारांच्या परेडमुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बळ मिळेल आहे
आधी दोन गुन्हेगारांची परेड
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन दिवस गुन्हेगारांची परेड घेतली. यासंदर्भात ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी सांगितले की, गुन्हेगारांबद्दल कडक कारवाई होणार आहे. नुसती अटक नाही तर कडक कारवाई देखील केली जाते, हे दाखवण्यासाठी परेड घेतली गेली. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त करण्याचा आमचा उद्देश आहे. कायदा कुणी हातात घेऊ नये, ही सूचना सर्व गुंड आणि गुन्हेगारांनी दिल्या आहेत.
अन्यथा त्यांची खैर राहणार नाही. सोशल मीडियावर हिरो दाखवण्याचा कुणाचा प्रयत्न असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करणार होणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत बदल्या आम्ही सुरू केल्या आहेत. एकाच जागी जास्त काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.