पुणे शहरात चाललंय तरी काय? मध्यरात्री झाला थरार, पोलिसांवर केला गोळीबार

Pune Firing on Police : पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होत नाही. कधी कोयता गँग दहशत निर्माण करते. तर कधी रस्त्यावर तलवारीने केक कापला जातो. आता तर गुन्हेगारांनी पोलिसांवर गोळीबार केला आहे.

पुणे शहरात चाललंय तरी काय? मध्यरात्री झाला थरार, पोलिसांवर केला गोळीबार
Pune PoliceImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 10:51 AM

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी कमी होत नाही. सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यातील वातावरण बदलू लागले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहर अन् परिसरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. कधी कोयता गँगचा धुमाकूळ घालते. कधी सर्वसामान्यांच्या गाड्यांची तोडफोड होते. रस्त्यावर केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही केला जातो. पुणेकर नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांचा प्रयत्न सुरु आहे. पुणे पोलीस गुन्हेगारी मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचे हे प्रयत्न अपूर्ण पडत आहे. आता तर पोलिसांवर गोळीबार करण्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.

मध्यरात्री काय झाले

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी कोम्बिंग ऑपेरेशन सुरु केले. पुण्यातील वारजे माळवाडी भागात पोलिसांचे ऑपरेशन सुरु होते. रात्री एक वाजता क्राइम बँच युनिट ३ चे पोलीस कर्मचारी कोबिंग ऑपरेशन करत होते. यावेळी म्हाडा वसाहतीत तपासणी सुरु होती. यावेळी रोजरी शाळेजवळ आठ ते दहा जणांच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद दिसल्या.

मग पुढे काय झाले

पुढे जे काही झाले ते भीती निर्माण करणारे होते. पोलिसांनी आरोपींच्या दिशेने वाटचाल सुरु केली. त्यावेळी एका आरोपीने पोलिसांवर बंदूक रोखली. त्यानंतर पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी आरोपींवर गोळीबार सुरु केला. यावेळी धारधार शस्त्र त्या लोकांनी पोलिसांवर फेकली. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्यानंतर आंधाऱ्याचा फायदा घेऊन आरोपी पळण्याचा प्रयत्न करु लागले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी केला पाठलाग सुरु

पोलीस आरोपींचा पाठलाग करु लागले. अखेर पाच जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. इतर पाच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन टेकडीच्या दिशेने पळून गेले. अटक केलेल्या आरोपींकडून जिवंत काडतूस, चाकू अन् इतर शस्त्र जप्त केले आहे. हे आरोपी एटीएम लुटल्याच्या तयारीत होते. वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ हा प्रकार घडला.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.