AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyber crime in pune| पुणेकरांवर ‘सायबर चोरांचा’ डल्ला ; ऑनलाईन फसवणुकीच्या वर्षात १७ हजारहून अधिक तक्रारी

नागरिकांचा वाढता नेट बँकिंगचा वापर लक्षात घेत चोरट्यांनीही आपला मोर्चा ऑनलाईन फ्रॉडकडे वळवला आहे. नागरिकांनी मोबाईल तसेचसोशल मीडिया साईटवर आपली खासगी माहिती, बँक डिटेल्स , फोटो, व्हिडीओ कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत शेर करू नयेत.

Cyber crime in pune| पुणेकरांवर 'सायबर चोरांचा' डल्ला ; ऑनलाईन फसवणुकीच्या वर्षात १७ हजारहून अधिक तक्रारी
cyber crime
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 12:15 PM
Share

पुणे – शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब , उद्योगनगरी यासारख्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात ऑनलाईन गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करणे,डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड, मेट्रोमोनिअल साईट, परदेशी नोकरीचे आमिष , ऑनलाईन लॉटरी यासारख्या अनेक प्रकारे नागरिकांची फसवणूक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वर्षभरात शहरातील सायबर गुन्हेशाखेकडे ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या तब्बल १७ हजार ९७८ तक्रार अर्ज आले आहेत.

ऑनलाईन व्यवहार घातक सोशल मीडियावर चोरांकडून बनावट प्रोफाईल करत फसवणूक केली जात आहे. यामध्ये अनेकदा पीडित व्यक्तीची माहिती काढत तिच्याशी मैत्री केली जात आहे. त्यातून लग्नाचे, भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केली जात आहे. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लूट केली जात आहे. बँक अकाऊंट हॅक करत, क्रेडिट कार्ड हॅक करतही फसवणूक होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऑनलाईन फसवणूकी तक्रारी वाढलया असल्याची माहिती सायबर सेलने दिली आहे.

नोटाबंदीनंतर ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल वाढला. त्यातच कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यावर भर दिला. नेट बँकिंग सिस्टिममुळे ऑनलाईन फ्रॉडही वाढला आहे. अनेक शॉपिंग साईटवरच्या बनावट साईट सुरु करूनही अनेक ठिकाणी नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार                अर्ज

ऑनलाईन बँकिंग / एटीएम –                   8 हजार 846

ऑनलाईन बिझनेस –                                3 हजार 797

सोशल मीडिया –                                      4  हजार 175

हॅकिंग-                                                     311

डेटा चोरी –                                                 75

मोबाईल –                                                  587

नागरिकांनी खबरदारी बाळगावी नागरिकांचा वाढता नेट बँकिंगचा वापर लक्षात घेत चोरट्यांनीही आपला मोर्चा ऑनलाईन फ्रॉडकडे वळवला आहे. नागरिकांनी मोबाईल तसेचसोशल मीडिया साईटवर आपली खासगी माहिती, बँक डिटेल्स , फोटो, व्हिडीओ कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत शेर करू नयेत. जेणे करून फसवणूक होण्यापासून तुम्ही वाचाल. बँकिंगबाबत फोनवर मागितले जाणारे ओटीपी शेअर करू नका. असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे

VIDEO : व्हायरल व्हिडिओमधल्या या ट्रेनला आग नाही लागली, तर सजवलंय! UKमधला व्हिडिओ होतोय व्हायरल

Chandrakant Patil | एसटी विलीनीकरण शक्य नाही तर आश्वासन का दिलं? चंद्रकांत पाटलांचा सवाल

खोटे गुन्हे नोंद करणारे तुम्ही, अत्याचार करणारे तुम्ही, मग आम्हाला गोळ्याही तुम्हीच घाला; सुजाता पाटील यांचा आक्रोश

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.