Dehu Gambling : देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरेंना जुगार खेळणे भोवणार, संस्थानकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता

विद्यमान विश्वस्त विशाल मोरे पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे संस्थान आधी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणार आहे. त्यामध्ये विशाल मोरे यांनी समाधानकारक खुलासा दिला नाही तर त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार, असे नितीन महाराज मोरे यांनी स्पष्ट केले.

Dehu Gambling : देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरेंना जुगार खेळणे भोवणार, संस्थानकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता
देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरेंना जुगार खेळणे भोवणारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 7:33 PM

देहू : तीन पत्ती जुगार खेळताना अटक केलेल्या देहू संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे (Vishal More) यांच्यावर निलंबना (Suspend)ची कारवाई होण्याची शक्यता आहे. चाकण एमआयडीसी जवळील येलवाडी गावातील एका बंद कंपनीमध्ये दुसऱ्या मजल्यावर हा जुगार अड्डा सुरू होता. संत तुकाराम महाराज संस्थाचे आजी-माजी विश्वस्त तसेच देहू नगरपंचायतीचे नगरसेवक आणि एका नगरसेविकेच्या पतीसह 26 जणांना तीन पत्ती जुगार खेळताना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून काल अटक (Arrest) करण्यात आले आहे. यामुळे वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली. यानंतर देहू संस्थानने विद्यमान विश्वस्त विशाल मोरे यांना संस्थेच्या पदावरुन निलंबित करण्याची शक्यता आहे.

देहू संस्थान आधी विशाल मोरेंकडे खुलासा मागणार

जुगार खेळणाऱ्या संत तुकाराम महाराज संस्थांच्या विश्वस्तावर संस्थान करणार कारवाई करणार असल्याचे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी सांगितलं. पोलिसांच्या ताब्यात असलेले विद्यमान विश्वस्त विशाल मोरे यांच्यावर संस्थांमधून निलंबित होण्याची कारवाई होऊ शकते. विद्यमान विश्वस्त विशाल मोरे पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे संस्थान आधी त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देणार आहे. त्यामध्ये विशाल मोरे यांनी समाधानकारक खुलासा दिला नाही तर त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार, असे नितीन महाराज मोरे यांनी स्पष्ट केले.

जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी 26 जणांना अटक केले

देहूमधील संत तुकाराम महाराज संस्थानचे विद्यमान विश्वस्त विशाल केशव मोरे आणि माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे यांच्यासह देहू नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक मयूर टिळेकर आणि एका नगरसेविकेचे पती विशाल परदेशी यांचा अटक आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी एकूण 26 जणांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 35 लाख 10 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Dehu Sansthan Trustee Vishal More likely to be suspended in gambling case)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.